[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ब्रश ओला केल्यास काय होते?
सुक्या ब्रशमुळे ब्रिसल्ससोबत फ्रिक्शन चांगल्याप्रकारे होते. तर ओला ब्रश मॉइश्चर आणण्याचे काम करते. अनेक लोकं ब्रशला ओला करून दात घासण्यास पसंत करतात. तर काही जणांना सुक्या ब्रशने दात घासायला आवडते.
ब्रश ओला करावा की नाही
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दात घासताना ब्रश आणि टूथपेस्ट जेवढे महत्वाचे आहे. तितकेच महत्वाचे ब्रश सुके ठेवणे आहे. कारण ब्रश ओला केल्यामुळे टूथपेस्टचा प्रभाव कमी होतो. आणि दात स्वच्छ होण्यास अडथळे निर्माण होतात.
ब्रश ओला केल्यावर होते नुकसान
ब्रश ओला केल्यावर दातांचे मोठे नुकसान होते. ओल्या ब्रशमुळे खूप फेस निर्माण होतो पण ब्रश दातांवर घसरतो. यामुळे दात चांगले स्वच्छ होत नाहीत.
ब्रश असे स्वच्छ ठेवा
ब्रशला पाण्याने ओला करायचे नसल्यामुळे त्याला कॅप लावून ठेवा. कारण ब्रश उघडा ठेवल्यास त्यावर धूळ जमा होऊ शकते. एवढेच नव्हे तर बाथरूममध्ये झुरळ, कोळी फिरत असल्यास त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.
टूथब्रश ओला करणे घातक
टूथब्रशवर टूथपेस्ट लावण्यापूर्वी टूथब्रश ओला न करण्याचा सल्ला डॉ. विपिन डेहणे करतात. असे केल्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. जिवाणूंच्या वाढीसाठी ओला ब्रश एक माध्यम असू शकतो. ओल्या ब्रशवर टूथपेस्ट लावल्यास हिरड्यांमध्ये संसर्ग निर्माण होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत, ब्रिस्टलची गुणवत्ता आणि कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. हे ब्रिस्टल्सच्या साफसफाईच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम करू शकते आणि पेस्टच्या फोमिंग वैशिष्ट्यांवर परिणाम करू शकते.
एवढेच नव्हे तर ओले ब्रश वापरल्याने पेस्टची चव खराब होऊ शकते. एखाद्या व्यक्तीचे हिरडे आणि दात दीर्घकाळ निरोगी राहतील याची खात्री करण्यासाठी योग्यप्रकारे दात घासणे महत्वाचे असते.
[ad_2]