Sri Lanka World Cup Squad Dasun-shanaka-lead-sri-lanka-squad-for-world-cup-2023-latest-sports-news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sri Lanka World Cup Squad : भारतात होणाऱ्या विश्वचषखाला बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक आहेत. क्रिकेटच्या महाकुंभाची सुरुवात पाच ऑक्टोबरपासून होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यामध्ये अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना रंगणार आहे. तर त्याआधी २९ सप्टेंबरपासून सराव सामन्याला सुरुवात होणार आहे. त्याआधी आता श्रीलंका संघाची विश्वचषकासाठी घोषणा करण्यात आली आहे. विश्नचषकासाठी लंकेचा संघ भारतात दाखलही झालाय.  दासुन शनाका वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका संघाचे नेतृत्व करणार आहे.  कुसल मेंडिस उप-कर्णधार म्हणून काम पाहणार आहे. दुखापतीमुळे वानंदु हसरंगा याला विश्वचषकाला मुकावे लागले आहे. 

दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. सात ऑक्टोबर रोजी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येणार आहेत. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.

वर्ल्ड कपसाठी श्रीलंका संघ –

दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उप कर्णधार), कुसल परेरा, पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, दुशन हेमंथ, महीश तीक्षणा, दुनिथ वेलालगे, कसुन रजिथा, मथीश पथिराना, लहिरु कुमारा आणि दिलशान मदुशंक

राखीव खेळाडू – चमिका करुणारत्ने

श्रीलंका वनडे विश्व कप 2023 संपूर्ण वेळापत्रक













सामने तारीख ठइकाण
श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रीका 7 अक्टूबर दिल्ली
श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 12 अक्टूबर हैदराबाद
श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 16 अक्टूबर लखनौ
श्रीलंका विरुद्ध नेदरर्लंड 21 अक्टूबर लखनौ
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड 26 अक्टूबर बेंगळुरु
श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान 30 अक्टूबर पुणे
श्रीलंका विरुद्ध भारत 2 नवंबर मुंबई
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश 6 नवंबर दिल्ली
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड 9 नवंबर बेंगळुरु

 



[ad_2]

Related posts