Warren Buffett Berkshire Hathaway Single Share Makes You Crorepati Can Buy More Than 300 Apple Iphone 15

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Highest Share Value: आयफोन 15 खरेदी करण्यापेक्षा अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये (Apple Shares) पैसे गुंतवाल तर करोडपती व्हाल, असं सांगणारे अनेक लोक तुम्हाला भेटत असतील. पण तुम्ही कधी अ‍ॅपलच्या शेअरची किंमत चेक करायचा प्रयत्न तरी केला आहे का? या व्यतिरिक्त देखील जगात एक अशी कंपनी आहे, जिच्या एका शेअरची किंमत आज कोट्यवधींमध्ये आहे. या कंपनीच्या एका शेअरच्या किमतीत तुम्ही 300 आयफोन 15 (iPhone 15) खरेदी करु शकता.

जगात अशी एक कंपनी आहे जिच्या एका शेअरची किंमत (Share Price) 5.45 लाख डॉलर आहे. भारतीय चलनात बोलायचं झालं तर, या कंपनीच्या एका शेअरची किंमत सुमारे साडेचार कोटी रुपये आहे. या कंपनीचा शेअर जगातील सर्वात महाग शेअर्सपैकी (One Of World’s Expensive Share) एक आहे.

वॉरन बफेशी कनेक्शन

तर हा शेअर बर्कशायर हॅथवे (Berkshire Hathaway) या कंपनीचा आहे, ज्याचे अध्यक्ष आणि सीईओ सध्या वॉरेन बफे (Warren Buffett) आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, वॉरेन बफेची एकूण संपत्ती सुमारे $120 अब्ज आहे. ते जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची ओळख ही एक यशस्वी व्हेंचर कॅपिटलिस्ट (Venture Capitalist) म्हणून आहे, ज्यांनी छोट्या-छोट्या बचत (Small Savings) आणि गुंतवणुकीतून (Investment) एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे.

खरेदी करू शकता 300 iPhone 15

बर्कशायर हॅथवेच्या शेअरची किंमत भारतीय रुपयात 4.5 कोटी रुपये आहे. iPhone 15 च्या Pro Max व्हर्जनची किंमत देखील जवळपास 1.59 लाख रुपये आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर, आज जर तुमच्याकडे बर्कशायर हॅथवेचा एक शेअर असता, तरी तुम्ही सुमारे 300 iPhone खरेदी करू शकला असता.

अ‍ॅपलच्या शेअरने होऊ शकता मालामाल

आणखी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे, 2007 मध्ये जगातील पहिला iPhone लाँच झाल्यापासून तुम्ही आयफोनचे सर्व बेस मॉडेल्स खरेदी केले असतील, तर तुम्हाला कमीत कमी 6.3 लाख रुपयांचा खर्च आला असेल. पण हेच तुम्ही iPhone ऐवजी तुम्ही तेव्हापासून अ‍ॅपलचे शेअर्स खरेदी करत राहिले असते, तर या 6.3 लाख रुपयांचे आज 50 लाख झाले असते. आज तुम्ही 50 लाख रुपयांचे मालक बनला असता.

टीप: कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या

हेही वाचा:

iPhone 15 Series Price: महागड्या iPhone 15 ची मुंबईकरांमध्ये क्रेझ, खरेदीसाठी दुकानांबाहेर लोकांची तुफान गर्दी, 22 सप्टेंबरपासून विक्री सुरु

[ad_2]

Related posts