Wrestlers Protest Jantar Mantar Delhi Bajrang Punia Slams Delhi Police Over Fir Against Them

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Wrestlers Protest News: दिल्लीच्या (Delhi) जंतरमंतरवर (Jantar Mantar) महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनात (Wrestlers Protest News) सहभागी असलेल्या बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पोलिसांनी मध्यरात्री सोडलं. बाहेर आल्यानंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर (Delhi Police) निशाणा साधला आहे. बजरंग पुनिया म्हणाला की, हे या देशाचं दुर्दैव आहे, ज्याच्यावर वारंवार लैंगिक छळाचे आरोप होत आहेत, असा आरोपी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित होता. 

बजरंग पुनिया म्हणाला की, दिल्ली पोलिसांनी आमच्याविरुद्ध केवळ 7 तासांत एफआयआर (FIR) नोंदवला, पण बृजभूषण (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी त्यांना 7 दिवस लागले. तसेच, बजरंग पुनियानं कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत पुढची रणनिती काय असेल? याबाहतही माहिती दिली. बजरंग पुनिया म्हणाला की, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत घरी जाण्यात काहीच अर्थ नाही.

कोणाकोणावर दाखल करण्यात आला एफआयआर (FIR)? 

कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत बोलताना बजरंग पुनिया म्हणाला की, मी बाकीच्या पैलवानांना भेटेन आणि एकत्र येऊन पुढे काय करायचं ते ठरवू. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंच्या निदर्शनाचे आयोजक आणि समर्थकांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

नेमकं काय घडलं?

देशाची राजधानी दिल्लीत नव्या संसदेचं लोकार्पण होत असतानाच दुसरीकडे दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंवर भर रस्त्यात बळाचा वापर करुन त्यांचं आंदोलन मोडीत काढण्यात आलं. कुस्तीपटूंवर केलेल्या बळाच्या वापरानं काँग्रेसकडून पीएम मोदींवर कडाडून हल्ला चढवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यानतंर नव्या संसदेसमोर झटापट झाली. बॅरिकेट्स ओलांडून पैलवान नवीन संसदेच्या दिशेनं कूच करत असतानाच दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखत बजरंग पुनिया, विनेश-संगिता फोगट, साक्षी मलिक यांना ताब्यात घेतलं. 

news reels Reels

दिल्ली पोलिसांनी एवढ्यावर न थांबता जंतर-मंतरवरील तंबू, खुर्च्या आणि इतर वस्तू हटवून आंदोलन मोडीत काढले. विनेश आणि संगीता फोगट यांना दिल्लीतील कालकाजी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. गेल्या 34 दिवसांपासून जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू नव्या संसदेसमोर होत असलेल्या महिला महापंचायतीत सहभागी होणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या महापंचायतीला परवानगी दिली नाही. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर पैलवानांनी महापंचायत आयोजित करून संसदेच्या दिशेनं कूच करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंवर बळाचा वापर केला. 

पाच राज्यातील शेतकरी महिला महापंचायतीला

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी दिल्लीतील नवीन संसद भवनाबाहेर ही महापंचायत होणार होती. कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक 23 एप्रिलपासून ब्रृजभूषण यांच्या अटकेसाठी जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. महिला महापंचायतीत हरियाणा व्यतिरिक्त यूपी, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आणि दिल्ली येथील खाप भागातील लोक आणि शेतकरी सहभागी होणार होते.

जंतरमंतरवर कुस्तीपटूंचं आंदोलन 

कुस्तीपटू गेल्या 34 दिवसांपासून जंतरमंतरवर निदर्शनं करत आहेत आणि WFI प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून भाजप खासदारांवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

[ad_2]

Related posts