World Cup 2023 Squad Deadline Today Will India Swap Axar Patel With Ravi Ashwin Latest Marathi Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ravi Ashwin vs Axar Patel : विश्वचषकाच्या संघात बदल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. म्हणजे, विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात आज बदल करण्याची संधी आयसीसीने दिली आहे. त्यानंतर संपूर्ण विश्वचषकादरम्यान संघात बदल होऊ शकत नाही. दरम्यान, अक्षर पटेल आणि आर. अश्विन यांच्याबाबत भारतायी चाहत्यांच्या मनात प्रश्न आहेत. अक्षर पटेल याला आशिया चषकादरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरोधात आर. अश्विन याला संधी देण्यात आली. त्यामुळे विश्वचषकात अक्षर खेळणार की अश्विन याबाबतचा प्रश्न उपस्थित राहिलाय. 

अक्षर पटेलच्या जागी वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये अश्विनचा समावेश?

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या चमूमध्ये अक्षर पटेल  याचा समावेश आहे. पण अक्षर पटेल सध्या दुखापतीचा सामना करत आहे. अक्षर पटेलच्या अनुपस्थिती संधी मिळालेल्या अश्विन याने भेदक मारा केला. ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विनने दमदार कामगिरी केली. त्यामुळे अक्षर पटेल याच्या जागी अश्विनला संधी मिळणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आलेय. विश्वचषकाच्या संघात बदल करण्याची आज अखेरची तारीख आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेलय. 

आशिया चषकात अश्विन भारतीय संघाचा भाग नव्हता. पण अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाला अन् अश्विनचे नशीब बदलले. अश्विनला मायदेशात होणाऱ्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले. अश्विनने निवड समितीला निराश केले नाही. अश्विनकडे तगडा अनुभव आहे. त्याशिवाय त्याचे आकडेही बरेच काही बोलतात.  अश्विन हा डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध अत्यंत प्रभावी पर्याय ठरतो. त्याचबरोबर कुलदीप यादवला स्पिनर म्हणून भारताच्या विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. मात्र, याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा असेल. अक्षर पटेलच्या फिटनेसवर प्रश्न कायम आहेत. अक्षर पटेल तंदुरुस्त झाला नाही तर अश्विनचे स्थान निश्चित मानले जातेय. 

विश्वचषकात अश्विनला संधी, काय म्हणाला द्रविड 

विश्वचषकाच्या संघात आर. अश्लिनल संधी देण्याबाबत कोच राहुल द्रविड यांना प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. ते म्हणाले की,  विश्वचषकाच्या संघात गुरुवारपर्यंत बदल केला जाऊ शकतो. आपल्याला अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल. एनसीए निवडकर्ते आणि अजित अगरकर यांच्या संपर्कात आहे. आताच यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. जर काही बदल असेल तर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. सध्या संघात कोणताही बदल नाही. 

अश्विनचे वनडे करियर
अश्विनने भारतासाठी 115 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये रवी अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट घेतल्या आहेत. २५ धावा देऊन चार विकेट, ही अश्विनची वनडेतील सर्वोच्च बॉलिंग फिगर आहे. त्याशिवाय गरज पडल्यास अश्विन फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अश्विनने वनडेमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.

आणखी वाचा :

मालिका जिंकल्यानंतर रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही, हिटमॅनने असे का केलं? कारण…

𝗠𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽 𝗕𝗲𝗴𝗶𝗻𝘀…. सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, भारताचा सामना कधी ?

[ad_2]

Related posts