( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने चंद्राच्या दूरच्या बाजूला सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. अशावेळी चीनच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
भारतीय शास्त्रज्ञ विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला दोन आठवड्यांच्या थंड चंद्र रात्रीनंतर हायबरनेशनमधून पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनच्या पहिल्या चंद्र मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ चिनी विश्व-रसायनशास्त्रज्ञ ओयांग झियुआन यांनी ही टिप्पणी केली.
चांद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ध्रुवीय प्रदेशात नव्हती किंवा ती ‘अंटार्क्टिक ध्रुवीय क्षेत्राजवळ’ नव्हती, असे विधान चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य ओउयांग यांनी केले आहे. ओयांग यांनी अधिकृत सायन्स टाईम्स वृत्तपत्राला याबद्दल माहिती दिली. युक्तिवाद चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाविषयी वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल भिन्न धारणा?
पृथ्वीवर, दक्षिण ध्रुवाला 66.5 ते 90 अंशांच्या दरम्यान दक्षिणेकडे परिभाषित केले आहे. कारण त्याचा परिभ्रमण अक्ष सूर्याच्या सापेक्ष सुमारे 23.5 अंशांनी झुकलेला असतो. चंद्राचा कल केवळ 1.5 अंश असल्याने, ध्रुवीय प्रदेश खूपच लहान आहे, असा यामागे तर्क लावण्यात आला आहे.
चंद्राचा दक्षिण ध्रुव 80 ते 90 अंश आहे असा NASA चा अंदाज आहे. तो 88.5 ते 90 अंशांवर आणखी लहान आहे, जे चंद्राचे 1.5 अंशाचा झुकाव प्रतिबिंबित करतो असे Ouyang म्हणाले .
हाँगकाँग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने नाकारला इओंगचा युक्तिवाद
हाँगकाँग विद्यापीठाच्या अंतराळ संशोधन प्रयोगशाळेतील एका शास्त्रज्ञाने ओयांगचे निराधार दावे फेटाळले आहेत. ‘ज्या क्षणी तुम्ही दक्षिण ध्रुवाच्या जवळ रोव्हर उतरवता, आणि निश्चितपणे दक्षिण ध्रुव प्रदेश म्हणून परिभाषित केले जाते, ते आधीच एक मोठे यश आहे, असे हाँगकाँग विद्यापीठातील अंतराळ संशोधन प्रयोगशाळेचे संचालक क्वेंटिन पार्कर यांनी सांगितले. यामुळे भारताकडून काहीही हिरावून घेतले जाऊ नये, असे मला वाटते, असेही ते पुढे म्हणाले.