Pune Dagadusheth Ganpati Visarjan Miravnuk On Time Anant Chaturdashi Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Visarjan Miravnuk 2023: पुण्यातील दगडूशेठ गणपतीचं विसर्जन (Pune Ganeshotsav 2023) यंदा वेळेत म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशीच झालं. गुरूवारी रात्री 8.52 मिनिटांनी दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. दगडूशेठ गणपतीची मिरवणूक संध्याकाळी 4 वाजता सुरू झाली आणि रात्री 8.52 वाजता पांचाळेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आलं. यंदाच्या वर्षाप्रमाणे आता पुढील काळात नेहमी अनंतर चतुर्दशीच्या दिवशीच दगडूशेठ गणपतीचं विसर्जन करणाचा संकल्प ट्रस्टकडून करण्यात आला आहे. 

विसर्जन मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या दिवशीच करावं असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे. या आधी ते शक्य होत नव्हतं. आपण दहा दिवस भक्तीभावाने पूजा आणि विसर्जनाच्या दिवशी वेळ सर्वावर पाणी फेरतो. त्यामुळे यावर्षी आम्ही वेळेत विसर्जन करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार महिनाभर आधी त्याची कल्पना दिली होती. वेळेत निघालेल्या मिरवणुकीला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि हा बदल भक्तांनी स्वीकारला. आता ही परंपरा या पुढे कायम ठेवण्यात येईल. 

मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलिस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत. परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला होता. मागील वर्षी सकाळी 7.45 वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले.  म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी 4 च्या दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता विसर्जन पार पडलं. 

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 6 वाजून 32 मिनिटांनी विसर्जन झाले. डेक्कन परिसरातील महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आलं.

पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं 5 वाजून 55 मिनिटांनी विसर्जन

पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं विसर्जन 5 वाजून 55 मिनिटांनी करण्यात आलं. पाचांळेश्वर घाटावर या गणपतीला निरोप देण्यात आला.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं 5 वाजून 11 मिनिटांनी विसर्जन झालं. पालखीत दाखल होत मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली होती. अखेर अनेकांनी तांबडी जोगेश्वरी बाप्पाला साश्रु नयनांनी निरोप दिला.

4 वाजून 35 मिनिटांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचं विसर्जन

पुण्यातील ग्रामदैवत आणि मानाच्या पहिला कसबा गणपतीचं विसर्जन थाटामाटात कऱण्यात आलं. नदी पात्रातील हौदात पारंपरित पद्धतीने 4 वाजून 35 मिनिटांनी विसर्जन करण्यात आलं. 

 

[ad_2]

Related posts