Nashik Gautami Patil Show At Dindori Jilha Parishad School Minister Deepak Kesarkar Direct Warning Know Details Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Gautami Patil Show Row: नाशिकच्या (Nashik News) दिंडोरीमधील (Dindori Jilha Parishad School) जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रकरणाची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. कार्यक्रम आयोजित करणारे घरी जातील, असा गंभीर इशाराच दिपक केसरकरांनी दिला आहे. 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर बोलताना म्हणाले की, “गौतमी पाटील हिला कोणी नाचवलं, हे आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी नाचवलं तो घरी जाईल, असं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर यावरून टीका करणाऱ्यांचाही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला आहे. 

“शाळा वाईन कंपन्यांना कोणी दिली माहिती नाही. आमच्या जीआरप्रमाणे शाळा वाईन कंपन्यांना देण्यास बंदी आहे. मुळात एकाही शाळेचं खासगीकरण झालेलं नाही. अफवा कोण उठवतं? माहिती नाही. मुळात जीआर आहे, तो सीएसआर मनीसंदर्भात आहे. तुम्हाला माहिती आहे का? सीएसआरचे पैसे कुठे जातात? NGO कडे जातात. एनजीओकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मुलांपर्यंत हे पैसे अजिबात पोहोचत नाही.”, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. तसेच, मुलांच्या शाळेसाठी चांगल्या सुविधा निर्माण होत असतील आणि त्यासाठी पैसे येत असतील तर तुम्हाला आक्षेप काय आहे? असंही केसरकर म्हणाले आहेत. 

गौतमी पाटील नाचली याचा फायदा घेऊन एका चांगल्या स्कीमला बदनाम करण्याचा अधिकार दिला? असा संतप्त सवाल करत गळक्या खोल्या आणि पडकी छप्पर हेच चित्र महाराष्ट्रात राहिले पाहिजे का? याचा ही विचार केला पाहीजे, असे खडे बोल मंत्री केसरकर यांनी विरोधकांना सुनावले आहेत.

दरम्यान, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. गौतमीचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरण आहे. अशा परिस्थितीत एका जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तिचा कार्यक्रम आयोजित झाल्यामुळे दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केलीय.

पाहा व्हिडीओ : Deepak Kesarkar : नाशकात शाळेत गौतमी पाटीलला नाचवणारे घरी जातील

                                   

[ad_2]

Related posts