Sharad Pawar And Junnar MLA Atul Benke Sharecar In Junnar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात पाठिंबा दिलेल्या आमदाराला आपल्या गाडीत बसवलं आहे. अतुल बेनके (Atul benke) असं या आमदाराचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. आता मात्र शरद पवारांनी त्यांना आपल्या गाडीत बसवल्याने चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. शरद पवार जुन्नर येथील आदिवासी मेळाव्यात सहभागी झाले आहेत. त्यासाठी ते जुन्नरला आले आहेत.

अजित पवार गटाला पाठिंबा दिलेल्या अतुल बेनकेंच्या हस्ते शरद पवारांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे बाकी स्थानिक नेतेही उपस्थित होते. स्वागत झाल्यानंतर शरद पवार हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघत होते. त्यावेळी त्यांनी अतुन बेनके यांनादेखील गाडीत बसण्याचा इशारा केला. त्यावेळी अतुल बेनके त्यांच्या गाडीत बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे आणि शरद पवार त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. 

शिवाय शरद पवार यांनी या संपूर्ण नियोजित कार्यक्रमादरम्यान पत्रकार परिषद घेतली. त्यावेळीदेखील अतुल बेनके त्यांच्या बाजूला बसून असल्याचं दिसलं. त्यानंतर दोघांनी जेवणदेखील सोबत केलं. अजित पवार गटाला पाठिंबा दिला आणि शरद पवारांच्या बाजूला बसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. 

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार पुन्हा मैदानात

काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीत मोठी फुट पाडली. त्यात शरद पवारांच्या अनेक जवळच्या नेत्यांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवला. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का सहन करावा लागला. पवार गट आणि शरद पवार गट असे राष्ट्रवादीत आता दोन गट तयार झाले आहेत. अजित पवारांना अनेक तरुण आणि धडाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याने पक्षाची मोट बांधण्यासाठी आता शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.

शरद पवार जुन्नर येथील आदिवासी मेळाव्यात सहभागी झाले आहेत. याच मेळाव्याची जबाबदारी अतुल बेनके यांना देण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी अतुल बेनके यांनी . मेळाव्याच्या स्थळाची पाहणी केली होती. त्यावेळी मी कुठल्या गटात नसून माझी निष्ठा ही पवार कुटुंबाप्रती आहे, असं ते म्हणाले होते. अजित पवारांच्याही कार्यक्रमाची तयारी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 

इतर महत्वाची बातमी-

Sharad Pawar : भाजपसोबत गेलेल्या नेत्यांंचं काय? जुन्नरची जागा कोणाची? अन् राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण?; शरद पवारांनी धडाधड सगळंच सांगून टाकलं!

[ad_2]

Related posts