Transgender Controversy In Heptathlon Asian Games 2023 Swapna Barman Says Nandini Is A Transgender

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Swapna Barman vs Nandini Agasara : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) हेप्टाथलान इव्हेंटमध्ये भारतीय खेळाडूमधील वाद समोर आला आहे.  हेप्टाथलान क्रीडा प्रकारात तृतीयपंथी खेळाडूने पदक जिंकल्याचा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे, आरोप करणारी आणि जिच्यावर आरोप झाला… त्या दोघीही भारतीय खेळाडू आहेत. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games 2023) भारतीय खेळाडूंमधील वाद समोर आला आहे. भारतीय महिला खेळाडू स्वप्ना बर्मन (Swapna Barman) हिने तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नंदिनी अगसरा (Nandini Agasara) हिच्यावर गंभीर आरोप केला आहे. स्वप्ना बर्मन (Swapna Barman) हिच्या ट्विटमध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) रविवारचा दिवस भारतासाठी चांगला राहिलाय.  भारताची एकूण पदक संख्या 50 पार पोहचली. रविवारी महिला हेप्टाथलान फायनलमध्ये भारतीय एथलीट स्वप्ना बर्मन (Swapna Barman) चौथ्या क्रमांकावर राहिली. त्यामुळे कांस्य पदक थोडक्यात हुकले. स्वप्ना बर्मन हिने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या महिला खेळाडूवर गंभीर आरोप केला. धक्कादायक म्हणजे, तिसऱ्या क्रमांकावर असणारी खेळाडू भारतीयच होती. भारतीय एथलीट नंदिनी अगसरा (Nandini Agasara) हिने कांस्य पदकावर नाव कोरले होते. नंदिनी हेप्टाथलान तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती, त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. पण चौथ्या क्रमांकावर आलेल्या स्नप्ना बर्मन हिने तिच्यावर तृतीयपंथी असल्याचा आरोप केला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) हेप्टाथलान क्रीडा प्रकारात चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या स्वप्ना बर्मनने  ट्वीट केले. या ट्वीटमुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली.
स्वप्ना बर्मन हिने नंदिनीला तृतीयपंथी म्हटले. त्याशिवाय नंदिनीने आपले पदक माघारी द्यायला हवे, असेही ट्वीटमध्ये तिने म्हटले. 

19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मला माझे कांस्य पदक एका तृतीयपंथी महिलेच्या हातून गमवावे लागले. मला माझे पदक परत हवे आहे. कारण, हे ऍथलिटिक्सच्या नियमांच्या विरुद्ध आहे. कृपया माझी मदत करा आणि माझी साथ द्या, असे ट्वीट स्वप्ना बर्मन हिने केलेय. 



[ad_2]

Related posts