Heavy Rainfall Is Likely To Occur In Five Districts Including Kolhapur Satara And Pune In A Short Period Of Time In The Next 12 Hours

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update : पुढील 12 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे तसेच घाट क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे झाड उन्मळून पडणे, दरड कोसळणे, डोंगरांवरून माती वाहून येण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दरड कोसळून अपघात होण्याचे प्रमाण पावसाळ्यामध्ये सातत्याने वाढलं आहे. त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts