Mallikarjun Kharge To Be New Chief Convener Of India Alliance Nitish Kumar Denied Post Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विरोधी पक्ष इंडिया अलायन्सने (I.N.D.I.A.) आपल्या अध्यक्षाची निवड केली आहे. इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या नावावर एकमत झाले. त्याामुळे इंडिया आघाडीची कमान काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर राहणार हे निश्चित झाले आहे. विरोधी गटाच्या बैठकीत जागावाटपापूर्वी सभापतींच्या नावावर एकमत झाले. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती. मात्र नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला.

अध्यक्ष हा काँग्रेसचा असावा, असे नितीश म्हणाले

इंडिया आघाडीच्या बैठकीत सखोल विचारविमर्शानंतर काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांची इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडीने अद्याप कोणतीही जागा वाटपाची चर्चा केली नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्वोच्च पदाचे दावेदार होते. मात्र नितीशकुमार यांनीच काँग्रेसमधून कोणीतरी कमांड हाती घ्यावी अशी सूचना केली. राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर आता त्यांच्यासमोर जागावाटपाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हाताळायचा आहे.

महत्त्वाची जबाबदारी खर्गे यांच्या खांद्यावर असेल

इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे खरगे आता विरोधी गटाचा चेहरा असतील. अशा स्थितीत खरगे यांना प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपाचे महत्त्वाचे आव्हान पेलावे लागणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते खरगे यांची जबाबदारी आता दुहेरी होणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने पक्षहिताबरोबरच आघाडी एकसंध ठेवण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे.

नितीश यांनी समन्वयकपद नाकारले

इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वयक पदावरही चर्चा झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार यांच्या नावाचा काँग्रेसने प्रस्ताव ठेवला होता. मात्र नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला. आपल्याला कोणत्याही पदामध्ये स्वारस्य नसल्याचे नितीश कुमार म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, तळागाळात युतीचा विस्तार करणे आवश्यक आहे. महायुतीत सामील असलेल्या पक्षांमध्ये एकजूट असणे गरजेचे आहे. 

इंडिया आघाडीचा अध्यक्ष निवडल्यानंतर आता जागावाटपाची चर्चा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी वाचा :

[ad_2]

Related posts