Shani Gochar : ‘या’ 7 राशींवर 2025 पर्यंत शनिदेवाची विशेष कृपा! तिजोरी छोटी पडेल एवढा धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shani Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रातील सर्वात महत्त्वाचा ग्रह कर्माचा दाता आणि न्यायदेवता शनिमुळे जाचकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शनिदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा तो 12 राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. सध्या शनि स्वगृही कुंभ राशीत असून तो प्रतिगामी अवस्थेत असणार आहे. शनिदेव या राशीत 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे 7 राशींवर शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे. (shani gochar 2023 these 7 zodiac signs will be rain of money till 2025)

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी शनी गोचर चांगल ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअर आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.  व्यावसायिक यश आणि समाजात मान-सन्मानही या काळात वाढणार आहे. 

वृषभ (Taurus) 

या राशीच्या लोकांसाठी शनी गोचर अतिशय शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे. या काळात तुम्ही कौटुंबिक नातं मजबूत होणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या. आयुष्यात करिअरची उंच शिखर गाठणार आहात. कुटुंबाला आवश्य वेळ द्या. 

सिंह (Leo)

या राशीसाठी शनिदेव फलदायी ठरणार आहे. 2025 पर्यंत तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. कुंडलीत  7व्या घरात शनि असल्याने तुमचं वैवाहिक जीवन आनंदमय होणार असून नातं मजबूत होणार आहे. शिवाय धनलाभाचे योगही आहेत. 

तूळ (Libra)

शनी गोचर तूळ राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कुंडलीतील दहाव्या घरात शनिदेव विराजमान असल्याने करिअरमध्ये प्रगती होणार आहे. आर्थिक समृद्धी आणि यशस्वी व्यावसायिक तुम्ही नावारूपाला येणार आहे. तुम्ही करिअरमध्ये उंच शिखर गाठणार आहात. 

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील 11व्या घरात शनि ग्रह उपस्थित आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. अनेक क्षेत्रात तुम्हाला यश आणि प्रगतीची मार्ग मोकळे होणार आहे. अडचणींवर तुम्ही मात करणार आहात. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद येणार असून तुमचं नातं मजबूत होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी शनीचं संक्रमण चांगल असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात सहज यश प्राप्त होणार आहे. तुमचे नातेसंबंध चांगले होणार आहे. जीवनात सुख समृद्धी लाभणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts