Kerala Kochi Google Map Misguided Car In River Two Doctors Death

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Map Misguided Car : सध्या तंत्रज्ञानावर (Technology) आपण खूपच अवलंबून आहोत. पण, या तंत्रज्ञानावर डोळे बंद करु विश्वास ठेवण्याची चूक करू नका. तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणं दोघांना महागात पडलं असून यामुळे त्यांचा जीव गेला आहे. गुगल मॅपमुळे (Google Map) रस्ता चुकल्याने नदीत बुडून कारचा अपघात झाला. केरळमधील (Kerala News) कोच्ची (Kochi News) येथे ही घटना घडली आहे. गुगल मॅप (Google Map News) मुळे रस्ता चुकल्याने एक कार नदीत (Kerala Car Accident) बुडाली आणि या अपघाता दोन डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, ती जण जखमीही झाले आहेत. 

गुगल मॅप वापरणं जिव्हारी! 

कोच्चीजवळील गोथुरुथ येथील पेरियार नदी (Periyar River) मध्ये कार बुडाली आणि अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात झाला, तेव्हा मुसळधार पाऊस (Kerala Heavy Rain) सुरु होता आणि यावेळी कारचालक गूगल मॅपचा वापर करत होता. जोरदार पावसामुळे (Heavy Rain) कारचालकाला समोरचं काही दिसत नव्हतं. यानंतर तो गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गाने पुढे गाडी चालवत राहिला आणि यावेळी कार थेट नदीत बुडून अपघात घडला.

थेट नदीत गेली कार, दोन डॉक्टरांचा मृत्यू

शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारात ही घटना घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात डॉ. अद्वैत (29 वर्ष) आणि  डॉ. अजमल (29 वर्ष) चा मृत्यू झाला आहे. हे दोघेही खासगी रुग्णालयात होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अद्वैत गाडी चालवत होते आणि गुगप मॅपचा वापर करत होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, गोथुरुथमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे दृश्यमानताही खूपच कमी होती. गाडी चालवणारा तरुण गुगल मॅपने दाखवलेल्या मार्गावरून जात होता. त्याला कार डाव्या वळणावर वळवायची होती, मात्र तो चुकून पुढे गेला आणि गाडी नदीत कोसळली.

कोचीहून कोडुंगल्लूरला परतताना अपघात

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली. शनिवारी डॉ. अद्वैतचा वाढदिवस होता. कारमध्ये अद्वैतसह अन्य चार जण होते. हे पाचही जण कोचीहून कोडुंगल्लूरला परतत होते. हे लोक अद्वैतच्या वाढदिवसाला खरेदीसाठी गेले होते, अशी माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts