Beed Crime News Argument Over Food Firing In Beed District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीड: शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका तरुणावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. ज्यात हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीडच्या (Beed) पाथरूड गल्लीमध्ये ही घटना उघडकीस आली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने धाव घेतली आहे. तर, पोलीस अधीक्षक यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. जेवणावरून झालेल्या वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मनोज जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, रितेश गायकवाड असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 

बीड शहरातल्या पाथरूड गल्लीमध्ये कौटुंबिक वादातून एका तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली असून, जखमी तरुणाला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. मनोज जाधव असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून, रितेश गायकवाड याने त्याच्यावर गोळीबार केला आहे. तसेच, या घटनेनंतर रितेश फरार झाला आहे. 

मनोज जाधव हा बीड शहरातल्या पाथरूड गल्लीमध्ये आपल्या मामाच्या घरी रात्री जेवण करण्यासाठी गेला होता. यावेळी रितेश आणि मनोज या दोघांमध्ये जेवण्याच्या कारणावरून वाद झाला. याच रागातून रितेशने मनोजच्या छातीवर गोळी झाडली. तसेच तो तेथून फरार झाला. त्यानंतर जखमी झालेल्या मनोजला बीडचा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बीडच्या शहर पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या रितेश गायकवाडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. 

पोलीस अधीक्षक घटनास्थळी…

या प्रकरणानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली आहे. तसेच, रितेश गायकवाड यांच्या घराची झाडाझडती घेतली आहे. यावेळी बंदुकीतून फायर झाल्यानंतर जी रिकामी कॅप असते ती पोलिसांनी हस्तगत केली आहे.  त्यामुळे आता बीड शहरामध्ये विनापरवाना बंदुकीची विक्री कोण करत आहे? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. 

मराठवाड्यात गावठी कट्टे येतात कोठून? 

मागील काही दिवसांत मराठवाड्यात गावठी कट्टे सहज मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाई एकूण सात गावठी कट्टे पकडण्यात आले आहेत. सोबतच जालना पोलिसांनी देखील कारवाई करत दोन गावठी कट्टे ताब्यात घेतले आहे. बीड जिल्ह्यात देखील पोलिसांकडून सतत कारवाई करून गावठी कट्ट्यावर कारवाई होत आहे. पण मराठवाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे कोठून येत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

लग्नानंतरही पत्नी बॉयफ्रेंडसोबत बोलायची, अनेकदा समजावूनही फरक पडला नाही; शेवटी पतीने जीवन संपवलं

[ad_2]

Related posts