maharashtra news live updates today 7 th April 2024 CM Eknath Shinde uddhav thackeray sharad pawar pm modi Lok sabha election 2024 seat Sharing BJP Shivsena NCP Congress india allince Maharashtra Politcal Updates in Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gudi Padwa 2024 : कल्याण येथील एका महिलेने एक पर्यावरणपूरक गुढी  तयार केली असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतिल घरी पाडव्याच्या दिवशी उभारली जाणार आहे. ही गुडी पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आली असून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही गुढी देणार आहे. देशात राम मंदिराची उभारणी केल्याबद्दल आणि देशाच्या संस्कृतीचे संवर्धन केल्याबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी ही गुढी टपालाने पाठववण्यात येणार आहे.

 

 मेधा मोहन आघारकर या कल्याण शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांनी त्यांच्या घरी गुढी तयार करण्याच्या व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी तयार केलेली गुढी ही पर्यावरणपूरक आणि सुंदर असून ही गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी चैत्र पाडव्याच्या दिवशी त्यांच्या घरी उभारणार आहेत.

 

 आजच्या धकाधकीच्या जीवनात तसेच अनेक जण कामाच्या व्यापात असल्याने त्यांना त्यांच्या घरी गुढी उभारणे शक्य होत नाही. तसेच या सणाची माहिती देखील अनेकांना माहिती नसते. यामुळे या सणाचे महत्व टिकून राहावे आणि याची माहिती सर्वांना मिळावी आणि त्या माध्यमातून संस्कृती रक्षण व्हावे या हेतूने मेधा आघरकर या गेल्या १५ वर्षापासून त्यांच्या घरी कागद, कपड्याच्या पर्यावरणपूरक गुढ्या तयार करत आहेत.

[ad_2]

Related posts