Different Disease Pune Accused In Drug Trafficking Case Lalit Patil Escapes From Sassoon Hospital In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे ससूनचे प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. ललित मागील चार महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता. वेगवेगळ्या आजाराची कारणं देत हा उपचार घेत असल्याचं समोर आलं आहे.  आधी टीबीवर उपचार घेत होता. त्यानंतर हर्नियावर उपचार घेतले आणि आता अल्सरवर उपचार घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात वेगवेगळ्या कारणाने या ललितला आश्रय देत होतं का?, असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

त्यातच या ललिलकडे दोन महागडे फोनदेखील सापडले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्यावर केलेल्या कारवाईनंतर  ललित पाटीलकडे सापडलेले दोन मोबाइल फोन आत कसे गेले ?, ललित हा फोनवरुन संवाद साधत असल्याचे बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना कसे समजले नाही ?, वॉर्डमधील बंदोबस्त पाहणीची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची असते. त्यांनी तेथे वेळोवेळी भेट दिली आहे का?, अधिकारी भेटीचे नोंद रजिस्टर पोलिसांनी तपासले आहे का?मागील तीन महिन्यांत येथे पोलिसांना ड्युटी कोणी लावली?, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 

रविवारीच या ससून रुग्णालयासमोर 2 कोटींचं मेफेड्रोन हा अंमली पदार्थ सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी सुभाष जानकी मंडल, ललित पाटील आणि रऊफ रहिम शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. हे तिघेही या ससूनमध्ये ड्रग्स रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं आहे. त्यात सुभाष मंडल आणि  रऊफ रहिम शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि 6 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

पोटाचा विकार झाल्याचा बनाव…

ललित पाटील हा उपचार घेत होता. दोनच दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील चाकण भागात अमली पदार्थांची तस्करी करताना  बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याची रवानगी येरव़डामध्ये करण्यात आली होती करण्यात आली. मात्र येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने त्याने त्याला पोटाचा विकार झाल्याचा बनाव रचला आणि तीन महिन्यांपूर्वी तो ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाला. कैद्यांसाठी असलेल्या वॉर्ड नंबर 16 मधे त्याला ठेवण्यात आलं. या 16 नंबर वॉर्ड बाहेर पोलिसांचा पहारा असतो. मात्र ससून रुग्णालयातील कर्मचारी रौफ शेख आणि येरवडा कारागृहात ओळख झालेला सुभाष मंडल यांना हाताशी धरुन ललित पाटीलने ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डमधून ड्रग्ज रॅकेट चालवायला सुरुवात केली. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Sassoon Hospital : पोलिसांना चकवा, Drug Trafficking आरोपीचं पलायन; पोलिसांच्या भूमिकेवर संशय

 

 

[ad_2]

Related posts