Maharashtra Raju Shetti On Sugar Factory Industry Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पंढरपूर:  मी वीस बावीस वर्षाचा होतो तेव्हापासून साखर कारखाने अडचणीत असल्याचे ऐकत आहे.  मला मिश्या फुटल्या आता त्या मिश्या पांढऱ्या झाल्या तरी हेच ऐकायचे का अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी आज जोरदार टोलेबाजी केली. अजित पवार यांनी साखर कारखान्यांबाबत कठोर भूमिका घेतल्यावर फडणवीस यांनी पुन्हा शासनाला हमी देण्याबाबत निर्णय फिरविल्याने शेट्टी यांनी फडणवीस यांना टोले लगावले आहे.

अजित पवार यांचे खाजगी कारखाने झाल्याने त्यांना उशिरा का होईना शहाणपणा सुचले आणि त्यांनी साखर कारखान्याच्या थकहमी बाबत योग्य ठाम भूमिका घेतली. कारखान्याच्या कर्जाची हमी शासनाने का घ्यावी? कारखान्यांनी पैसे बुडविले तर ते पैसे सरकारला म्हणजे जनतेला द्यावे लागतात असे सांगताना जर खाजगी कारखाने स्वतः हमीवर कर्ज घेऊन फेडतात मग यांनाच कशाला शासनाची हमी पाहिजे असा सवाल केला. या कारखान्यांना कारखाना मोडून खायचा आहे.त्यांचा हेतू स्वच्छ नाही म्हणून त्यांना वारंवार हमी द्यायची वेळ येते असा टोला राजू शेट्टी यांनी फडणवीस यांना लगावला आहे. 

पंकजा मुंडेंवर सरकारचा आशीर्वाद होता का?

पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याची जीएसटी इतकी दिवस थकू का दिली असा सवाल करत याला सरकारचा आशीर्वाद होता का असा सवाल  राजू शेट्टी यांनी  केला आहे. भुजबळ यांच्यावर नेमके आरोप काय हेच आठवत नसल्याचे ईडीच्या वकिलांनी सांगितल्याचे निदर्शनास आणून देताना मग भुजबळ तीन वर्षे जेलमध्ये का होते असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला . 

सध्या आम्ही राजकीय पक्षातील नेत्यांना संघटनेत प्रवेश देणे बंद केल्याचे सांगताना हा कच्चा माल आमच्याकडे येतो प्रॉडक्ट होऊन बाहेर पडतो आणि मार्केटमध्ये विकला जातो. आमच्या संघटनेचा वापर फक्त कार्यशाळेसारखा होऊ लागल्याने आता आम्ही कच्चा माल देखील पारखून घेत असल्याची मिश्किल टिप्पणी शेट्टी यांनी केली.

सरकारचा प्रशासनावर वचक नाही

नांदेड येथे हॉस्पिटलमध्ये झालेल्या मृत्यूबाबत शिंदे फडणवीस सरकारला निशाणा करताना सरकार आपल्या दारी येऊन अशी अवस्था होत असेल तर सरकारला आता आमच्या परसदारी यावे लागेल असा टोला लगावला. सरकारचा प्रशासनावर वचक नाही फक्त इव्हेन्ट करून प्रसिद्धी मिळविण्याचे ढोंग  हे सरकार करत असल्यानेच दवाखान्यात रुग्णांचे बळी जातात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या असल्याची टीका करताना एकंदरच या सरकारचे कामकाजाकडे लक्ष नाही आणि प्रशासनावर पकड नाही अशा शब्दात शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला

[ad_2]

Related posts