Nanded Hospital Tragedy Health Minister Tanaji Sawant Should Resign Today Rohit Pawar Demand In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : नांदेडमध्ये झालेल्या 24 तासांत 24 मृत्यूंमुळे राज्यात खळबळ  (Nanded Civil Hospital)  उडाली आहे. राजकीय नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी आजच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. काही महिन्यांपासून अशा घटना सातत्यानं घडताना दिसत आहे. त्या  रुग्णालयात औषधांचा अपुरा पुरवठा, कर्मचारी संख्या कमी आहे. आता आरोग्यमंत्र्यांना हे कळत नसेल तर त्यांनी आजच्या आज राजीनामा द्यायला हवा. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपला स्वतःच्या ताकदीवर किती ही घमंड असला तरी…

सेना आणि राष्ट्रवादीसोबत असले तरीही भाजप नेहमीच बॉस राहिला पाहिजे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर रोहित पवारांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, भाजपने स्वतःचेच नेते संपवले आहेत. खडसे, मुंडे आता गडकरींना ही तसंच केलं जातंय. त्यामुळं भाजपला स्वतःच्या ताकदीवर किती ही घमंड असला तरी जनता त्यांना योग्य जागा दाखवतील.

‘भाजपला इव्हेंट करायची सवय’

राज्यात सध्या वाघनाखावरुन चांगलंच राजकारण सुरु आहे. विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यातच रोहित पवारांनी देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, वाघ नखे येत असतील तर स्वागतच करावं लागेल. पण फक्त तीन वर्षांसाठी आणण्यापेक्षा ते कायमस्वरूपी कसं आणता येईल? यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासोबतच राज्यातील परिस्थितीवर ही बोलायला हवं. कारण भाजपला इव्हेंट करायची सवय आहे, त्याद्वारे इतर मुद्द्यांकडून दुर्लक्ष करायला त्यांचा प्लॅन असतो.

 जातीनिहाय जनगणना करा: रोहित पवार 

बिहार प्रमाणेच जातीनिहाय जनगणना व्हावी ही आमची भूमिका आहे. कोणता समाज किती संख्येत आहे, हे केंद्राला कळू द्यायचं नाही. पण ही आकडेवारी समोर आली, तर आरक्षणाचा मुद्दाही सुटू शकतो. हे घडलं असतं तर आत्तापर्यंत निवडणुका ही पार पडल्या असत्या, असं ते म्हणाले. 

‘शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य युवांना’

आज राज्यात शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका हा सर्वसामान्य युवांना बसत आहे. शासनाच्या या धोरणांचा राज्यात सर्वत्र विरोध होत आहे. अशातच राज्याच्या विविध भागात युवावर्ग आंदोलन देखील करत आहे. परंतु सरकार मात्र आपल्या राजकारणात व्यस्त असल्याने त्यांचे युवा वर्गाच्या या विषयाकडे सपशेल दुर्लक्ष असल्याचे पाहायला मिळत असल्याचं ते म्हणाले. 

हे ही वाचा :

Nanded Government Hospital Incident : मृत्यूचं तांडव सुरुच! नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाणांकडून ट्वीट

 

 

 

 

[ad_2]

Related posts