World Cup 2023 Schedule Timing Venues Teams Matches Information Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे. वनडे विश्वचषकाचा हा 13 वा हंगाम आहे. 5 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सलामीची लढत होत आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरपासून होत आहे. विश्वचषकासंदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर… 

1. कोणत्या संघांचा सहभाग ?

यंदाच्या विश्वचषकात 10 संघ सहभागी आहेत. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान, दक्षिण अफ्रीका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि नेदर्लंड्स संघाचा समावेश आहे.

2. किती सामने, फॉर्मेट कोणता ?
5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान 48 सामने होणार आहे. ही स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघ इतर संघासोबत एक एक सामना खेळणार आहे. आघाडीचे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. त्यानंतर नॉकआऊट सामने होतील. 

3. कधीपर्यंत सामने?
विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर 19 ऑक्टोबर रोजी मेगा फायनल होणार आहे. सुरुवातीचा आणि अखेरचा सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. 48 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. सकाळचे सामने साडेदहा वाजता सुरु होतील, तर डे नाइट सामने दुपारी दोन वाजता सुरु होतील. 

4. कोणत्या ठिकाणी होणार सामने ?
विश्वचषकाचे 48 सामने दहा शहरांमध्ये होणार आहेत. यामध्ये अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, बेंगळुरु, हैदराबाद आणि धर्मशाला, येथील मैदानाचा समावेश आहे. 

5. लाइव्ह स्ट्रीमिंग आणि टेलीकास्ट?
वर्ल्ड कप 2023 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिज्नी+हॉटस्टारवर पाहा येतील. तर टिव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर सामने पाहता येणार आहेत. 

6. रिजर्व डे ठेवण्यात आलाय का?
साखळी सामन्याला राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. सेमीफायनल आणि फायनल सामन्याला राखीव दिवस ठेवला आहे. सेमीफायनल आणि फायनलच्या प्रत्येक सामन्याच्या दुसऱ्या दिवशी राखीव दिवस असेल. 

7. यंदा वेगळं काय ?
गेल्या विश्वचषकापेक्षा यंदा कमी संघ सहभागी आहेत. दोन वेळची विश्वचषक विजेता वेस्ट इंडिजचा संघ यंदा स्पर्धेत सहभागी नाही. वेस्ट इंडिजचा संघ क्वालिफाय झाला नाही.

8. सेमीफायनल आणि फायनल सामने कुठे होणार?
फायनलचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. तर सेमीफायनलचे सामने वानखेड़ स्टेडियम, मुंबई आणि ईडन गार्डन्स, कोलकाता येथे होणार आहे. 

9. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत कधी ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होणार आहे. 

10. यजमानपदामध्ये वेगळे काय?
भारत पहिल्यांदाच एकटे यजमानपद करत आहे. याआधी  1987, 1996 आणि 2011 मध्ये भारताने दक्षिण आशियाई देशांसोबत मिळून यजमानपद सांभाळले होते.  

[ad_2]

Related posts