Maharashtra Palak Mantri 2023 Full List Of 36 Districts In Marathi CM Eknath Shinde Announced Guardian Minister Today Ajit Pawar Appointed Pune Devendra Fadnavis Nagpur Palakmantri

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Palak Mantri List :  राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे आज, पालकमंत्र्यांच्या (Palak Mantri List) नावाची यादी जाहीर झाली आहे.  राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

राज्यातील सुधारित पालकमंत्री (New Guardian Ministers) जाहीर करण्यात आले असून अजित पवार गटातील तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पाडून भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला (Shinde Group) कात्रजचा घाट दाखवला असल्याची चर्चा रंगली आहे. 

पालकमंत्री पदासाठी काही आमदार उत्सुक होते. मात्र, त्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले इच्छुक आहेत. भरत गोगावले यांचा अद्याप मंत्री म्हणून शपथविधीदेखील झाला नाही. तर, नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळ उत्सुक होते. मात्र, त्या ठिकाणी कोणताही बदल तूर्तास करण्यात आला नाही.  काही मंत्र्यांकडे दोन ते तीन जिल्ह्याची जबाबदारी आहे. नंदुरबारमध्ये (Nandurbar) गेल्या दोन पंचवार्षिक भाजपचा पालकमंत्री असताना आता राष्ट्रवादीचा शिलेदार जबाबदारी सांभाळणार आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ही काही जिल्ह्यांचा भार कमी करण्यात आला आहे. 

कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री ?

सांगली – सुरेश खाडे 
सातारा – शंभूराज देसाई
सोलापूर – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
पुणे – अजित पवार

अकोला – राधाकृष्ण विखे-पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
यवतमाळ – संजय राठोड
वाशिम – संजय राठोड

भंडारा – विजयकुमार गावित
चंद्रपूर – सुधीर मुनगुंटीवार
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
नागपूर – देवेंद्र फडणवीस 
वर्धा – सुधीर मुनगुंटीवार 

छत्रपती संभाजीनगर – संदीपान भुमरे
बीड – धनंजय मुंडे
जालना – अतुल सावे
धाराशिव – तानाजी सावंत
नांदेड – गिरीश महाजन 
लातूर – गिरीश महाजन 
परभणी – संजय बनसोडे
हिंगोली – अब्दुल सत्तार

 

अहमदनगर – राधाकृष्णा विखे पाटील
धुळे – गिरीश महाजन
जळगाव – गुलाबराव पाटील 
नंदूरबार – अनिल पाटील 
नाशिक – दादा भुसे

मुंबई शहर – दीपक केसरकर
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
ठाणे – शंभूराज देसाई
पालघर – रविंद्र चव्हाण
रायगड – उदय सामंत
रत्नागिरी – उदय सामंत 
सिंधुदुर्ग – रविंद्र चव्हाण 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

[ad_2]

Related posts