CID Investigation Nanded Government Hospital Case Sasanjay Shirsat Demand

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर : नांदेड (Nanded) येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजूनही मृतांचा तांडव सुरूच असून, आणखी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे यावरून आता राजकीय वातावरण देखील तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील यावर प्रतिक्रीया दिली असून, नांदेड प्रकरणाची सीआयडी चौकशी (CID Investigation) करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे. 

दरम्यान या सर्व प्रकरणावर प्रतिक्रीया देतांना शिरसाट म्हणाले की, “नांदेड जिल्हा रुग्णालयात तसेच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या सरकारी रुग्णालयांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये झालेल्या रुग्णांच्या आणि नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी.  या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील शिरसाट यांनी केली आहे. इतकेच नाही तर या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही” संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.

नांदेडच्या घटनेवरुन राजकारण करु नका, कारण हा हीन प्रकार असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. सर्वसामान्य रुग्णालयात गरिबांची मुले जातात. या ठिकाणी व्यवस्थित औषधोपचार केले जात नाहीत. कारण काही दलाल तिथे बसलेले असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. विरोधक सरकारवर आरोप करतात आणि नंतर सरकार सारवासारव करतात, आता हे बंद झाले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी या प्रकरणांची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.

आरोप प्रत्यारोप सुरूच…

नांदेड येथील घटनेवरून राजकीय वातावरण देखील तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी देखील केली. तसेच या घटनेला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे विरोधकांचे आरोप फेटाळून लावत नांदेड घटनेला प्रशासन किंवा सरकार जबाबदार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच या रुग्णालयात औषधांची कोणतेही कमी नसल्याचे देखील शिंदे म्हणाले आहेत. त्यातच आता उद्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Nanded Hospital Death : नांदेड शासकीय रुग्णालयात पुन्हा 6 रुग्णांचा मृत्यू, दोन नवजात बालकांचा समावेश

[ad_2]

Related posts