Mercury enters Libra zodiac signs should be careful till the evening of 6th November strong chances of loss in business and job

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Gochar In Tula Rashi : वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात बुध दोनदा राशी बदलत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला कन्या राशीत प्रवेश केला आहे. तर 19 ऑक्टोबरला शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 

19 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह सकाळी 01:23 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे. आणि 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:32 वाजता वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. बुधाचे हे गोचर प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करेल. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांनी 6 नोव्हेंबरपर्यंत थोडं सावध राहणं आवश्यक आहे. बुध तूळ राशीत प्रवेश करत असताना कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे, याची माहिती घेऊया.

मेष रास (Mesh Zodiac)

या राशीमध्ये बुध सातव्या भावात प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत कर्ज घेण्याची गरज भासू शकते. या काळात थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या नोकरीतही तुमच्या वरिष्ठांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतात. कामाचा ताण जास्त राहील. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला अधिक पैसे कमवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागू शकते.

वृषभ रास (Vrishabh Zodiac)

या राशीमध्ये बुध सहाव्या भावात प्रवेश करणार आहे. आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. कर्ज घेण्याचीही गरज भासू शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर नफा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. नोकरदार लोकांना पदोन्नतीची अपेक्षा असेल तर त्यांची निराशा होऊ शकते. आरोग्याबाबतही थोडे सावध राहा. तुम्हाला पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पदोन्नती होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. 

कर्क रास (Kark Zodiac)

बुधाच्या गोचरमुळे अधिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. वाहन आणि मालमत्तेशी संबंधित नुकसानास सामोरे जावे लागू शकते. तुम्ही नोकरी करत असल्यास, नवीन संधी थोड्या दूर असू शकतात. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु कोणताही व्यवसाय संबंधित व्यवहार करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts