Nashik Nandgaoun Accident Updates Car Fell Directly From Bridge Into The River Three Dead Including 4 Year Old Girl

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Nandgaoun Accident: नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये नाग्या-साक्या पुलावरून कार कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. 

नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये कार पुलावरून कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी आहेत. नांदगावच्या नाग्या-साक्या पुलावरून कार नदीपात्रात कोसळली. जालना जिल्ह्यात लग्न सोहळा आटोपून हे 10 जण परतत होते. तेव्हा मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला. जखमींवर मालेगावमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

नेमका कसा झाला अपघात? 

जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील नाग्या-साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून इको कार खाली नदीत कोसळली आणि अपघात झाला. भीषण अपघातात एका 4 वर्षीय बालिकेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीनं मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यानं प्रथमोपचार करत रुग्णांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

[ad_2]

Related posts