Beed Crime News Sale One Year Old Baby For Three And Half Lakhs In Beed District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बीड : शहरात एका वर्षांच्या चिमुकल्याची साडे तीन लाख रुपयांना विक्री करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. पतीने सोडून दिलेल्या 20 वर्षीय महिलेला दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एका वर्षांच्या मुलाला गोवा राज्यात साडे तीन लाख रुपयांना विक्री करण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. तर, विक्री केलेले बाळ सुखरूप असून, त्याला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय पिंटीचे (नाव बदलेले) एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यातून, तिने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती समजताच पतीने तिला सोडून दिले. त्यामुळे पिंटी मागील काही दिवसांपासून आईकडे म्हणजेच माजलगावला राहत होती. या काळात माजलगावातील ओळखीची असणाऱ्या छायाच्या घरी पिंटीचे येणेजाणे सुरु झाले. विशेष म्हणजे याचवेळी किशोर भोजने नावाचा व्यक्तीची पत्नीही नांदत नसल्याने तो देखील अधूनमधून छायाकडे येत होता. यावेळी त्याची पिंटीसोबत ओळख झाली आणि त्याने तिच्या 1 वर्षांच्या मुलाला आपले नाव दिले.

दरम्यान, यावेळी छायाने पिंटीला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखविले होते, तर तिचे मूल कोल्हापुरातील ललिता नावाच्या महिलेच्या मदतीने विक्री करण्याचा प्लॅन आखला. विशेष म्हणजे ललिता मुलं विकण्याचा व्यवसाय करत होती. त्यानुसार तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने ग्राहक शोधला आणि साडे तीन लाखात मुलाला विकले. मात्र, याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत बाळाची सुटका केली आहे. तसेच पाच आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत. 

आरोपींचे नावं…

छाया श्रीराम देशमुख (वय 38 वर्षे, रा. शाहूनगर, माजलगाव), किशोर वासुदेव भोजने (वय 32 वर्षे, रा. बुलढाणा), ललिता मनोहर भिसे (वय 38 वर्षे, रा. हातकणंगले जि. कोल्हापूर), दीपक गव्हाळकर ऊर्फ गवळी (रा. बेळगाव, कर्नाटक) आप्पा राघोबा केरकार (वय 65 वर्षे), नामदेव फोडू सावंत (वय 60 वर्षे) व स्वप्नजा महादेव जोशी (वय 38 वर्षे, सर्व रा. सत्तरी, उत्तर गोवा) अशी आरोपींची नावे आहेत. यातील दीपक व ललिता हे दोघे फरार असून, त्यांचाही शोध पोलिस घेत आहेत.

या पथकाने केली कारवाई

पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेखा धस, उपनिरीक्षक जगदीश मोरे, प्रताप वाळके, सुरेखा उगले, मनीषा राऊत, चंदा मुळे, सतीश बहिरवाळ, विकास नेवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Mumbai : नवजात शिशूंची पाच लाख रुपयांना विक्री; बाळांची विक्री करणाऱ्या बोगस डॉक्टरांसह टोळीला अटक, मुंबईत कारवाई

[ad_2]

Related posts