RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह ‘या’ बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RBI News : देशातील सर्व बँकिंग (Bank News) संस्थावर नियंत्रण ठेवत त्यांना मार्गदर्शक तत्त्वं आखून देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय एमपीसी बैठकीला बुधवारीच सुरुवात झाली. अद्यापही या बैठकीत घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयाची जाहीर माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना येत्या काळात बँकेकडून नव्या धोरणांबाबतची माहिती देताना नेमक्या काय घोषणा केल्या जातात याचसंदर्भातील उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बँकांनी सरशी दाखवत व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. 

इथं आरबीआयनं मागील तीन एमपीसी बैठकांमध्ये मुख्य दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. यावेळी या बदलांची अपेक्षा असतानाच काही बँकांकडून FD वरील व्याजदरांमध्ये बदल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

दरम्यान, सध्या कर्जावर सरासरी 110 बेस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. तर, बँकांनी सरासरी जमा रकमेवर 157 अंकांनी वाढ केली आहे. व्याजदराच्या तुलनेत जमा रकमेमध्ये वाढ केली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. रोख रकमेच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच बँकांकडून एफडीवर जास्त व्याज देत सध्या आर्थिक गरजा पूर्ण केल्या जात असल्याचं सांगितलं जात आहे. आरबीआयच्या कोणत्याही निर्णयापूर्वी एफडीवरील व्याजर वाढवणाऱ्या बँकांमध्ये एचडीएफसी, इंडसइंड बँकांचा समावेश आहे. 

इंडसइंड बँक 

खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेनं 2 कोटी रुपयांच्या एफडीपासून कमीत कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. बँकेकडून करण्यात आलेल्या या निर्णयानंतर सर्वसामान्य जनतेसाठी 3.50 टक्के ते 7.85 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.25 टक्के आणि 8.25 टक्के इतका व्याजदर ठरवण्यात आला आहे. बँकेच्या संकेतस्थळावरून देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर 2023 पासून हे नवे दर लागू होणार आहेत. 

HDFC बँक 

निर्धारित काळासाठी असणाऱ्या एफडीवर HDFC कडून कपात करण्यात आली आहे. ज्यानंतर सामान्य नागरिकांसाठी 7 दिवस ते 10 वर्षांसाठीच्या एफडीवर 3 ते 7.20 टक्के इतकं व्याज दिलं जाणार आहे. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी हे दर 3.5 ते 7.75 टक्के इतके असतील. ही नवी दर प्रणाली 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्या आली आहे. 

पंजाब अँड स‍िंध बँक 

सार्वजनिक क्षेत्रात येणाऱ्या पंजाब अँड स‍िंध बँकेनं 2 कोटींहून कमी एफडीवरील व्याजर बदलले आहेत. जिथं बँकेकडून करण्यात आलेल्या या बदलनांनंतर 7 दिवसांपासून 10 वर्षांमध्ये मॅच्योर होणाऱ्या जमा रकमेवर 2.8 ते 7.35 टक्के इतकं व्याज दिलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे दर 0.50 टक्क्यांनी जास्त असतील याची खातेधारकांनी नोंद घ्यावी. 

Related posts