Pune Political News Ajit Pawar Appointed Guardian Minister Of Pune Displeasure In Pune BJP Pune News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : अर्थमंत्रीपदानंतर पुण्याचं पालकमंत्री पद (Ajit Pawar) देखील अजित पवारांना देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं घेतला मात्र त्यामुळं पुणे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. भाजपच्या अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नाराजीला सोशल मीडियावर मोकळी वाट करून दिली. भाजपचे वरिष्ठ नेते या निर्णयाचं कितीही समर्थन करण्याचा प्रयत्न करत असले तरी अजित पवारांच्या आक्रमक राजकारणाचं आव्हान येत्या काळात त्यांना पुण्यात पेलावं लागणार आहे.

पुणे अजित पवारांचं होम पीच, राजकारणाचं पॉवर सेंटर…

पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांनी गुरुवारी अखेरची बैठक घेतली. त्यावेळी त्यांच्याबरोबरच भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावरील ताण स्पष्टपणे दिसून आला. देशातील, राज्यातील आणि पुणे शहरातील सर्वात मोठा पक्ष असतानाही पुण्याच्या पालकमंत्रीपदावर तुळशीपात्र ठेवावं लागल्यानं शहर भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. ज्या राष्ट्रवादीशी संघर्ष करून एक एक सत्तास्थानं काबीज केली, त्याच राष्ट्रवादीच्या ताब्यात पुण्याचा कारभार सोपवनं भाजपच्या राजकारणासाठी धोक्याचं ठरू शकतं, असं या कार्यकर्त्यांना वाटत आहे. पुणे हे अजित पवारांचं होम पीच आहे आणि त्यांच्या राजकारणाचं पॉवर सेंटर सुद्धा आहे. त्यामुळं पुण्याचं पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी अजित पवारांनी सुरुवातीपासूनच दबावतंत्राचा वापर केला. 

अर्थमंत्री बनताच अजित पवारांनी काय केलं?

– अर्थमंत्री बनताच अजित पवारांनी  चंद्रकांत पाटलांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात मंजूर केलेला 400 कोटी रुपयांचा निधी अजित पवारांनी अडवून धरला होता. मात्र त्याचवेळी अजित पवार समर्थक आमदारांना ग्रामीण विकास निधी मधून प्रत्येकी दहा कोटी रुपये तर समाजकल्याण विभागातून प्रत्येकी पाच कोटी रुपये मंजूर करण्यात केले. 

– अर्थमंत्री बनताच अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना डावलून बैठकांचा सपाटा लावला होता . 

– पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अजित पवार बैठका घेऊ लागल्यानं तेच पुण्याचे सुपर पालकमंत्री असल्याचं चित्र निर्माण झालं. अजित पवारांनी देखील त्यांची ही इच्छा लपवून ठेवली नव्हती.

पुणे शहरात भाजप-राष्ट्रवादीचं समीकरण कसं आहे?

पुणे शहरात भाजपचे सहा आमदार तर राष्ट्रवादीचे दोन आहेत. पुणे महापालिकेत भाजपचे 100 नगरसेवक आहेत तर राष्ट्रवादीचे 42 आहेत.  पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून मावळ लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाकडे तर बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाकडे आहे. तरीही अजित पवारांना पालकमंत्रिपद देण्याची वेळ भाजपवर आली.  मात्र तरीही हाय कमांडने घेतलेल्या निर्णयामुळं अजित पवारांच्या पालकमंत्री बनण्याचं समर्थन कारण्याची वेळ भाजप नेत्यांवर आली आहे. 

भाजपला अजित पवारांची गरज?

लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यानं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला अजित पवारांची गरज वाटत आहे. सत्तेच्या राजकारणात मुरलेल्या अजित पवारांनी ही ओळख नेमकी ओळखली आहे. किमान लोकसभा निवडणुकांपर्यंत तरी अजित पवारांचे हट्ट पुरवण्याशिवाय भाजप नेत्यांना पर्याय नाही हेच यातून दिसून येत आहे . 

अजित पवार पहिल्यांदा पुण्याचे पालकमंत्री बनले तेव्हा पुण्यात काँग्रेसचा दबदबा  होता, पुढे जिल्हा परिषद,  पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आणि इतर सत्ताकेद्रं कॉंग्रेसकडून निसटून राष्ट्रवादीकडे येत गेली.  पंधरा वर्षं मुख्यमंत्रीपद असुनही अजित पवारांच्या बेरकीपणाचा अनुभव कॉंग्रेसला आला.  आता भाजपची वेळ आहे. देशात निरंकुश सत्ता असलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांची गरज लागतेय पण स्थानिक पातळीवर मात्र त्यांनाच आव्हान पेलावं लागणार आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Ex-Corporator Rape : पुण्यात महिला लोकप्रतिनिधीच असुरक्षित?, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ओळखीच्या व्यक्तीकडून माजी नगरसेविकेवर लैंगिक अत्याचार

 

 

 

 

[ad_2]

Related posts