Maharashtra News Nashik News Kajwa Fireflies Festival In June By Directorate Of Tourism In Bhandardara, Opposition By Environmentalists

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kajawa Mahotsav : महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन संचालनालयाकडून (directorate of tourism) भंडारदरा, कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात दरवर्षी काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील 3 आणि 4 जून रोजी हा रोजी काजवा महोत्सवाचे (Kajwa Festival) आयोजन करण्यात आले आहे. मात्र काजवा महोत्सवावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे. 

दरवर्षीं भंडारदरा (Bhandardara), कळसुबाई-हरिश्चंद्रगड (Kalsubai) अभयारण्यात काजव्यांचा प्रकाशोत्सव (Fireflies Festival) आयजोंत केला जातो. निसर्गाचा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी असंख्य निसर्गप्रेमी पर्यटक हजेरी लावतात. याच पार्श्वभूमीवर पर्यटन संचालनालयाकडून 3 व 4 जून रोजी भंडारदरा वनपरिक्षेत्रातील पांजरे गावात आदिवासी लोककला (Trible Tourisam) नृत्याची सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. मात्र या काजवा महोत्सवाला पर्यावरण प्रेमींकडून विरोध करण्यात आला आहे. काजवा महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या पर्यटकांकडून निसर्ग पायदळी तुडवला जात असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे हा महोत्सव रद्द करावा, यावर बंदी घालावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

दरम्यान मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून ते जुनच्या पहिल्या पावसाच्या आगमनापर्यंत काजवा महोत्सव भरतो, संध्याकाळी सहा ते मध्यरात्री उशिरापर्यंत नाशिक (Nashik), मुंबई, पुणे, नगरसह राज्यभरातून इथे आलेल्या पर्यटकांचा धिंगाणा खुलेआम सुरु असतो. त्याचबरोबर अनेक पर्यटकांकडून मद्यसेवनही इथे केले जाते. एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे निसर्गामधील महत्त्वाचा असलेला व दुर्मीळ झालेला जीव काजवा संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचं पर्यावरणप्रेमी सांगत आहेत. अभयारण्यामधील वन्यजीव, पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित रहावा, या उद्देशाने या जंगलामध्ये वनविभागाच्या कायद्यानुसार सुर्यास्तानंतर प्रवेश निषिद्ध आहे, मात्र त्याचेही पालन होत नसल्याचे चित्र आहे. 

पर्यटन संचानालयाचा सांस्कृतिक महोत्सव 

पर्यटन संचालनालयाकडून काजवाप्रेमींसाठी सांस्कृतिक मेजवानी आयोजित करण्यात आली असून भंडारदरा पर्यटन संचालनालयाचा दोन दिवसीय उपक्रम राबविण्यात येणार आहे. भंडारदरा वनपरिक्षेत्रातील पांजरे गावठा सांस्कृतिक कार्यक्रमी आयोजीत केला आहे. येथील शेंडी वन तपासणी नाक्यावरून पर्यटकांना वन्यजीव विभागाचे प्रवेश शुल्क भरून प्रवेश करत अभयारण्यातील पांजरे गावापर्यंत पोहचावे लागणार आहे. येथील महसुली क्षेत्रात स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन थाटण्यात येणार आहे. काळा तांदूळ, हातसडीचा तांदूळ, नागली, विविध भरड धान्य आणि बांबू हस्तकलेपासून तयार केलेल्या विविध शोभेच्या वस्तूही पर्यटकांना खरेदी करता येणार असल्याचे संचालनालयाने दिलेल्या प्रसिद्धी- पत्रकात म्हटले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार तसेच त्यांच्या हस्तकलेला वाव मिळावा हा या प्रदर्शनामागील उद्देश असल्याचे उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी सांगितले. 

पर्यटकांनी नियमांचे पालन करा… 

नाशिक वन-वन्यजीव विभागाने घालून दिलेले नियम अभयारण्य क्षेत्रात काटेकोरपणे पाळावेत, जेणेकरून काजव्यांचा प्रजननकाळ धोक्यात येणार नाही. पर्यटकांनी त्यांची वाहने वाहनतळातच उभी करावी. काजवे ज्या झाडावर लुकलुकत असतील, त्या झाडापासून 50 फूट अंतर राखावे. यावेळी मोबाइल टॉर्च, एलईडी किंवा अन्य बॅटरीचा झोत झाडांवर टाकू नये. कुठलीही गाणी, वाहनांचे हॉर्न वाजवून गोंगाट, गोंधळ करू नये, असे आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास वन पोलिस विभागांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, त्यास पर्यटक स्वतः जबाबदार असतील, असे उपसंचालक सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

 

[ad_2]

Related posts