CBI Investigate Rajesh Tope In The Stone Pelting Case Demand For Devendra Fadnavis Pratishthan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरु असतांना, पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणकडून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. “पोलिसांवर दगडफेक करण्याचा आधीपासूनच प्लॅन करण्यात आला होता. आंदोलनात गरबड झाल्यास पोलिसांवर दगडफेक करण्याचे राजेश टोपे (Rajesh Tope) आणि त्यांच्या स्वीय सहायकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्लॅन होता असा आरोप देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आसाराम डोंगरे यांनी केला आहे. या बाबत जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील देण्यात आले आहे. 

पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 1 सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने मराठा समाज बांधवाचे उपोषण चालु होते. तेथे पोलीस बंदोबस्त होता. या पोलीस बंदोबस्तामध्ये काही समाजकंटक व जातीवादी लोक बाहेर गावावरून आले होते. तसेच हे लोक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शहागड व बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील असुन, या समाजकंटकाने पोलीस बांधवावर घरावरती जाऊन दगडफेक केली. सदरील दगडफेक केल्यामुळे आंदोलन चिघळले आणि नाईलाजास्तव पोलीस बांधवाना लाठीचार्ज, अश्रुधारचा मारा करावा लागला.

तर, 27 ऑगस्ट रोजी आमदार राजेश टोपे व त्यांच्या कार्यकर्त्यांची अंकुश सहकारी साखर कारखाना येथे एक गुप्त बैठक झाली होती. या बैठकीत सदरील मराठा समाज बांधवाच्या उपोषाणामध्ये काही गडबड झाली तर पोलीसांवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला गेला होता. त्यामुळे, आमदार राजेश टोपे व त्यांचे स्विय सहाय्यक, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलीस व सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. 

जरांगे यांचा सरकारवर आरोप…

दरम्यान एकीकडे राजेश टोपे यांच्यावर देवेंद्र फडणवीस प्रतिष्ठाणने गंभीर आरोप केले असतांना, दुसरीकडे मनोज जरांगे यांनी लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेचं झाला असल्याचा आरोप केला आहे. बीड येथील दौऱ्यात असतांना जरांगे म्हणाले की, “अंतरवाली सराटी गावात सुरु असलेले आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी सरकारकडून अनेक प्रकारचे डावपेच खेळण्यात आले. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला आपण सोडणार नाहीत, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आंदोलन चिघळण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये महिला आणि लहान मुलं मोठ्या प्रमाणात जखमी झाले. एवढं होऊन देखील सरकारने अद्यापही लाठीचार्ज का केला? याचे उत्तर दिलेलं नाही, असे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manjo Jarange : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर, आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा

[ad_2]

Related posts