Vasant More Future MP Of Pune Loksabha Maharashtra Political News And Pune Political News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सध्या पुणे शहराच्या खासदारकीच्या शर्यतीत प्रत्येक Vasant More) पक्षाचे उमेदवार आहेत. असं असताना आता मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे हे सुद्धा या शर्यतीत उतरले आहेत. येत्या 10 ऑक्टोबरला वसंत मोरे यांचा वाढदिवस असल्याने संपूर्ण पुणे शहरांमध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर लागलेले आहेत. या बॅनरवर भावी खासदार, असा आशय देखील लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे शहराचं नेतृत्व वसंत मोरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिळणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुणे लोकसभेसाठी मनसेची चाचपणी सुरू आहे. पुणे लोकसभेसाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे. जर पुणे लोकसभेसाठी मला उमेदवारी दिली तर नक्कीच आम्ही पुणेकरांचे प्रश्न सोडवू आणि पुणेकर भरभरून प्रेम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुण्यात कात्रज चौकात आणि बाकी सगळीकडे वसंत मोरे यांचे बॅनर्स झळकताना दिसत आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जरी हे बॅनर्स असले तरी या बॅनर्सवर भावी खासदार लिहिलेलं असल्याने या बॅनर्सची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांना पुण्यातील मनसेचे फायरब्रॅंड नेते म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी जनता दरबार आयोजित केलं होतं. त्यालादेखील पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील ते अनेकांच्या समस्या सोडवत असतात. थेट फेसबुक लाईव्ह करुन त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.  पुण्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळेच सगळीकडे त्यांचे बॅनर्स झळकताना दिसत आहे.

पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात

मागील काही दिवसांपासून वसंत मोरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाराज होते. त्यामुळे तडफदार नेते काही दिवसांपासून दुसऱ्या पक्षात जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरु होती. मात्र वसंत मोरे जागेवरुन हलले नाहीत त्यांनी मनसे सोडणार नाही, असं अनेकदा बोलून दाखवलं. आता मनसेकडूनही पुणे जिल्हातील गावागावात पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. त्याची जबाबदारी वसंत मोरे यांना देण्यात आली आहे. त्यात ते सध्या बारामतीकडे जास्त लक्ष देत आहे. या मतदार संघात मनसे वाढवण्याच्या तयारी दिसत आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Punit Balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; कोण आहेत पुण्यातील गणेश मंडळांना मालामाल करणारे पुनित बालन?

[ad_2]

Related posts