[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral Video: कधीतरी कोबी मंच्युरियन (Manchurian) खाणं कुणाला आवडत नाही? जे लोक फास्ट फूड (Fast Food) खूप आवडीने खातात, त्यांना मंच्युरियन खाणं देखील फार आवडतं. बहुतेक लोकांना वाटत असेल की, मंच्युरियन स्वच्छतेची (Hygiene) नीट काळजी घेऊन बनवले जातात आणि त्यामुळे लोक आवडीने मंच्युरियन खातही असतील. पण तसं नाही. मंच्युरियन बनवताना किती वाईट पद्धत अवलंबली जाते, हे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला तर आजपासूनच मंच्युरियन खाणं कायमचं बंद कराल.
ग्लोव्ह्स न घालता हातांनीच मिसळलं मिश्रण
मंच्युरियन बनवतानाचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. मंच्युरियन कशा प्रकारे बनवले जातात हे तुम्ही या व्हिडीओत पाहू शकता. काही लोक चटई टाकून कोबीला बारीक-बारीक तुकड्यांत कापताना दिसत आहेत. मंच्युरियन बनवणाऱ्या लोकांनी हातात ग्लोव्ह देखील घातलेले नाही.
कोबीचे बारीक टुकडे करुन त्यांना कॅरेटमध्ये टाकलं जात आहे, ज्या कॅरेटमध्ये बरीच घाण देखील जमलेली आहे. त्यातून नंतर एका मोठ्या भांड्यात ही बारीक केलेली कोबी टाकली जाते. यानंतर विविध प्रकारचे मसाले, मीठ आणि मैदा मिसळला जातो. हे सगळं झाल्यानंतर घामाटलेला अर्धा उघडा व्यक्ती त्याच्या हाताने हे मिश्रण एकजीव करतो. हे मिश्रण मिक्स करुन तो दुसऱ्या भांड्यात टाकतो, यानंतर छोटे-छोटे गोळे बनवून मंच्युरियन तळले जातात.
अस्वच्छतेचा कळस
जसं की आपण पाहू शकता, कोबी मंच्युरियन बनवतानाच्या या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणत्याही व्यक्तीने ना हातात ग्लोव्ह्स घातले, ना केस झाकण्यासाठी हेडकॅपचा वापर केला. आता जरा विचार करा, इतके अनहायजिनिक मंच्युरियन खाऊन तुमच्या आरोग्यावर त्याचा किती वाईट परिणाम होईल? तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की रस्त्यावर विकले जाणारे बरेच फास्ट फूड हे अशाच प्रकारे बनवले जातात, जे फक्त आपल्यासमोर तळून आपल्याला दिले जातात, पण या मागील प्रक्रिया आपल्याला माहीत नसते.
व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहूल लोक हैराण झाले आहेत. एका व्यक्तीने म्हटलं की, जितके जास्त तो अशा प्रकारचे व्हिडीओ पाहतो, तितकं बाहेरचे पदार्थ खाण्यावरुन त्याचं मन उठतं. तर दुसऱ्या एकाने म्हटलं की, घरात बनणाऱ्या पदार्थांमध्येच फक्त हायजिनची काळजी घेतली जाते.
हेही वाचा:
Health Tips: चपाती की भात? दोघांमधील शरीरासाठी जास्त फायदेशीर काय?
[ad_2]