NCP Hearing Update: Sharad Pawar Ran The Party In A Way That He Should Run A House Ajit Pawar Accused Gat | NCP Hearing Update : Sharad Pawar यांनी घर चालवावं तशा पद्धतीने पक्ष चालवला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?, घड्याळ चिन्ह कुणाचं? यावरून निवडणूक आयोगात आज दुसरी महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडलीय. या सुनावणीत अजित पवार गटाने थेट शरद पवारांची निवड आणि त्यांच्या कामकाजाबाबत गंभीर आरोप केलेत. शरद पवार यांनी घर चालवावं तशा पद्धतीने पक्ष चालवला. ते स्वत:च निवडून आलेले नसताना, त्यांनी केलेल्या नियुक्त्या वैध कशा? असा सवाल अजित पवार गटाने विचारलाय. त्याचसोबत, प्रफुल्ल पटेल आमच्यासोबत असून, त्यांच्याच सहीने अजित पवारांसह इतरांच्या नियुक्त्या झाल्या असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केलाय. दरम्यान, अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असतानाच, शरद पवार गटाने हस्तक्षेप करत, अजित पवार गटाने दिलेली आमदारांची यादी देण्यात यावी अशी विनंती केलीय. तर अजित पवार गट वारंवार निवडणूक आयोगावर दबाव टाकत असल्याचा आरोप शरद पवार गटाने केलाय.. दरम्यान राष्ट्रवादी चिन्ह, पक्षाबाबत पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला पार पडणार आहे. 

[ad_2]

Related posts