Mercury will enter the Tula sign this zodiac sign from 19th October will be rich

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Gochar In Tula: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्यांच्या वेळेनुसार आपल्या राशीमध्ये बदल करतात. बुध ग्रह व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, गणित यांचा कारक मानला जातो. ज्यावेळी बुध ग्रहाच्या चालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रांवर फरक पडताना दिसतो. येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार आहे

19 ऑक्टोबर रोजी बुध ग्रह तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्या या राशीबदलामुळे सर्व राशीच्या लोकांवर परिणाम दिसून येणार आहे. परंतु 3 राशी आहेत ज्यांना यावेळी करियर आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकणार आहे. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार आहे. 

मिथुन रास (Mithun Zodiac)

बुध राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बुध ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या घरात जाणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश मिळू शकणार आहे. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून आर्थिक लाभ मिळू शकतो. धनवृद्धीमुळे दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात.

मेष रास (Aries Zodiac)

तूळ राशीत बुधाचं गोचर तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. विवाहितांचे वैवाहिक जीवन यावेळी आनंदी राहणार आहे. अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कौटुंबिक सदस्यांसोबतच्या तुमच्या संबंधात बरीच सुधारणा होईल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ लाभदायक राहील. सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळणार आहे.

सिंह रास (Leo Zodiac)

बुधाचा राशी बदल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळू शकतं. छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts