[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : पुण्यातील मुक्तांगण (Pune News) शाळेत पहिलीतील 7 ते 8 मुलांचं लैगिक शोषण त्याच शाळेतील विद्यार्थ्यांनीच केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी दुख: व्यक्त केलं आहे. ट्विट करत त्यांनी याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील येथे आवश्यकता आहे, असं म्हटलं आहे. पुण्यात एका शाळेत 7 ते 8 मुलांचं लैगिक शोषण त्याच शाळेतील मुलांनी केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मोठ्या इयत्तेत शिकत असलेल्या मुलांनी खालच्या इयत्तेतील मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला. या मुलांच्या आरोपानंतर पालक आणि मनसे कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारात आंदोलन करत काही काळ शाळा बंद केली होती. याबाबत पुढील कार्यवाही करून गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन पोलिसांनी पालकांना दिले त्यानंतर आंदोलन थांबवण्यात आलं. पर्वती पोलीस अधिक तपास करत आहेत.
ट्विटमध्ये सुप्रिया सुळेंनी काय लिहिलं आहे?
पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील येथे आवश्यकता आहे.पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त यांनी याप्रकरणी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी. यासोबतच राज्य शासनाने देखील शालेय मुलांसाठी समुपदेशनाबाबत एक कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे. यासाठी या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, तज्ज्ञ व्यक्ती, मानसोपचारतज्ज्ञ आदींची बैठक घेऊन याबाबत सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
जीवे मारण्याची धमकी दिली…
पहिलीतील विद्यार्थ्याला त्रास दिल्याप्रकरणी मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंग कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूलमधील वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका अनुपमा गुजराती यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला वरच्या वर्गातील मुलं चुकीचा पद्धतीने स्पर्श करत होते. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास जीवे मारू, अशी धमकी विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यामुळे मुलगा घाबरला होता, असे तक्रारदार महिलेने फिर्यादीत म्हटलं आहे.
पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून याप्रकरणी पोलीसांनी लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी. या प्रकरणातील गुंतागुंत लक्षात घेता समुपदेशनाची देखील येथे आवश्यकता आहे.
पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त…
— Supriya Sule (@supriya_sule) October 10, 2023
इतर महत्वाची बातमी-
ललित पाटील प्रकरणानंतर कारागृह प्रशासन जागे; ससून रुग्णालयातून 12 कैद्यांची पुन्हा येरवडा जेलमध्ये रवानगी
[ad_2]