[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे आहे. या कामाचा व्याप वाढला आहे. त्यामुळे अजित पवारांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार हे गेल्या 32 वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळत होते. पण त्यांनी आता संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.
[ad_2]