A Shocking Incident Of A Wife Throwing Boiling Water On Her Husband With The Intention Of Killing In Baramati

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पत्नीने पतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने उकळते (Baramati News) पाणी अंगावर टाकल्याची धक्कादायक घटना बारामती तालुक्यात घडली. यात जखमी पती 40 टक्के भाजला गेला. बारामती तालुक्यातील पारवडीत ही धक्कादायक घटना घडली. सागर कुंभार असं जखमी तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून सागर कुंभार घरी झोपलेले असताना पत्नी कविता कुंभारने सागरच्या अंगावर आणि तोंडावर उकळते गरम पाणी टाकले. तेच पाणी छातीवर, पोटावर, गुप्तांग आणि पाठीमागील गुदद्वाराजवळील भागावर पडले. त्यात सागर कुंभार याची कातडी 40 टक्के भाजली. 

पाणी टाकल्यानंतर पत्नीने पडलेल्या लोखंडी पाईपने पतीच्या डोक्यात आणि पाठीवर मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर तसेच तुला आता जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यावरून सागर कुंभार यांनी फिर्याद दिल्यानंतर पत्नीवर बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भादवि कलम 307, 324, 506 अंतर्गत गुन्हा नोंद आहे. पुढील तपास बारामती पोलीस करीत आहेत.

प्रेयसीच्या बाळाला उकळत्या पाण्यात टाकलं…

काही दिवसांपूर्वी पुण्यातही असाच प्रकार घडला होता. अनैतिक संबंधांमुळे प्रियकराने प्रेयसीच्या सव्वा वर्षाच्या मुलाला उकळत्या पाण्यात टाकलं होतं. उकळत्या पाण्यात टाकल्याने बाळाचे संपूर्ण शरीर भाजले आणि उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना मन हेलावून टाकणारी होती. चाकण पोलीस हद्दीत ही घटना घडली असून शरद विक्रम कोळेकर असं गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव होतं. पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली असताना असे दिसून आले की, आरोपी आणि बाळाच्या आईचे अनैतिक संबंध होते. प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन बाळाला बाथरुमध्ये त्याचे हात पाय बांधून उकळत्या पाण्यात टाकले. बाळाचे संपूर्ण शरीर भाजले आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली होती.

माणुसकी शिल्लक नाही…

पुणेच नाही तर राज्यातील इतर भागातही अशाच घटना पुढे येतात. काही क्षृल्लक कारणांमुळे अनेक लोक एकमेकांच्या जीवावर उठल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्यात लहान बाळ असो किंवा कुटुंबातील इतर लोक यांच्याबाबत जराही आस्था उरली, नसल्याचं अशा घटनांमधून समोर येतं. त्यामुळे माणुसकी खरंच शिल्लक आहे का?, असा प्रश्न निर्माण होतो. 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts