SL Vs PAK World Cup 2023 Match Highlights Pakistan Won By 6 Wickets Against Sri Lanka Mohammad Rizwan Sports News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हैदराबाद : वर्ल्डकपच्या 48 वर्षांच्या इतिहासातील (pakistan Highest target successfully chased in World Cups) सर्वात मोठा विजय मिळवण्याचा पराक्रम पाकिस्तान क्रिकेट संघाने केला आहे. आज श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा सहा गडी राखून दणदणीत पराभव केला. श्रीलंकेने उभारलेल्या 345 धावांचा डोंगर पाकिस्तानने 48.2 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान राहिला. त्याने 121 चेंडूत 131 धावा ठोकताना शेवटपर्यंत नाबाद राहून पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याला सलामीवीर अब्दुल्ला शफिकची सुद्धा साथ मिळाली. त्याने 113 धावांची खेळी करत विजयाचा पाया रचला. पाकिस्तानची धावांचा पाठलाग करताना सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. 

सलामीवीर इमाम उल हक आणि कर्णधार बाबर आझम अवघी 37 धावसंख्या असताना बाद झाले होते. त्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा संकटात सापडला होता. मात्र, अब्दुल्ला आणि रिझवानने तिसऱ्या विकेटसाठी पावणे दोनशेची भागीदारी करत पाकिस्तानला विजयाच्या समीप नेले. अब्दुल्ला शफिक 113 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला सौद शकीलही 31 धावा करून बाद झाला. मात्र, इफ्तीकार अहमद आणि मोहम्मद रिझवान यांनी आणखीन पडझड न होऊन देता पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मोहम्मद रिझवान 131 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे पाकिस्तानने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. 

गोलंदाजांच्या हाराकरीमुळे सामना गमवावा लागला

दुसरीकडे, श्रीलंकेने मजबूत धावसंख्या उभारुनही गोलंदाजांच्या हाराकरीमुळे सामना गमवावा लागला. श्रीलंकेने दिलेल्या अतिरिक्त 26 धावा या त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या. अन्यथा सामन्याचे चित्र वेगळे दिसले असते. मोक्याच्या क्षणी फिल्डींगमधील हाराकारी सुद्धा त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. त्यामुळे दमदार धावसंख्या उभारूनही श्रीलंकेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. हा सलग दुसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला आहे.  पहिल्या सामन्यात सुद्धा त्यांना दक्षिण आफ्रिकाकडून दारुण पराभव स्वीकाराला लागला. त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 428 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, त्याचा पाठलाग करताना त्यांना 102 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

वर्ल्डकपच्या इतिहासातील चार वैयक्तिक शतके नोंदवणारा सामना

क्रिकेट वर्ल्डकपला प्रारंभ झाल्यापासून विक्रमांवर विक्रम रचले जात आहेत. स्पर्धेला सुरुवात होऊन एक आठवडा झाला नसतानाही गेल्या 48 वर्षांमधील विक्रम एक आठवडाभरात मोडीत निघाले आहेत. आज श्रीलंका विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात चार शतके या सामन्यामध्ये (the first ever ICC Cricket World Cup match with 4 individual centuries) नोंदवली गेली. त्यामुळे आजवरच्या वर्ल्डकपच्या इतिहासातील चार वैयक्तिक शतके नोंदवणारा सामना ठरला आहे. क्रिकेटचा इतिहासातील हा मोठा विक्रम आहे. वर्ल्डकपमध्ये आजपर्यंत झालेल्या कोणत्याही सामन्यामध्ये चार वैयक्तिक शतके नोंदवली गेली नव्हती. त्यामुळे हा एक रेकॉर्ड ब्रेक वर्ल्ड कप ठरत आहे. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने झळकावलेल्या विक्रमी शतकानंतर सदीरा समराविक्रमाने सुद्धा झळकावलेल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली.

[ad_2]

Related posts