India Vs Afghanistan Weather Report Today No Rain In New Delhi World Cup 2023 IND Vs AFG Match Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs Afghanistan, WC 2023 : विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) सामना रंगणार आहे. टीम इंडिया (Team India) ने विश्वचषकाची (ICC World Cup 2023) सुरुवात ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या विजयी सलामीने केली आहे. अफगाणिस्तान (Afghanistan Cricket Team) संघाला सलामी सामन्यात बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आज टीम इंडिया आणि अफगाणिस्तान संघ विश्वचषकातील त्यांच्या दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. दिल्लीतील (Delhi) अरुण जेटली स्टेडिअम (Arun Jaitley Stadium) वर दुपारी दोन वाजता आजचा सामना पार पडणार आहे. या साम्न्यावेळी दिल्लीतील हवामान कसं असेल, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

IND vs AFG, Delhi Weather Forecast : सामन्यावेळी दिल्लीतील हवामान कसं असेल?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल. आज दिल्लीत हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असेल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. बुधवारी, 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत पावसाची शक्यता नाही. दिल्लीत बुधवार ते शुक्रवार या कालावधीत हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत राहण्याची शक्यता आहे.

आज दिल्लीत हवामान अंशतः ढगाळ असेल पण पावसाची शक्यता फारच कमी असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कमाल तापमान 35-37 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 19-23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्यामुळे चाहते आजच्या सामन्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकतील.

सुरुवातीच्या फळीतील फलंदाजांवर दबाव

टीम इंडिया पुन्हा एकदा त्यांचा स्टार सलामीवीर शुभमन गिलशिवाय मैदानात उतरणार आहे. शुभमन गिल आजारपणामुळे वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यातून बाहेर गेला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलामी सामन्यात भारताची सुरुवातीची फळी फेल ठरली. रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल दमदार खेळी करत 200 धावांचा पाठलाग करत संघाला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts