Pune Drug NCP Raids In Junrar Taluk Narcotic Drug Alprazolam Seized

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव (drug mafiya) या गावात मुंबई येथील नार्कोटिक्स विभागाने मोठी कारवाई केली असून यात मोठ्या प्रमाणावर अंमली औषध साहित्य जप्त करण्यात आले आहे. 7 आणि ८ ऑक्टोबरला  ही मोठी कारवाई झालेली असून अतिशय ही कारवाई अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आली.

यावेळी प्रसारमाध्यमे, स्थानिकांना घटनास्थळापासून दुर ठेवण्यात आलेले होते. अंमली पदार्थ सापडलेल्या ठिकाणाला सील लावण्यात आलेले आहे. पिंपळगाव गावातून वडगाव सहानी गावात जाणाऱ्या रोडलगत राजन वर्‍हाडी यांचे घर आणि शेती असून घरालगत पत्र्याचे शेड आहे. याच शेडमध्ये ड्रग्ज साहित्य तयार करण्यात येत होते. राजन वर्‍हाडी यांनी हे शेड जाधव नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिले असल्याचे स्थानिकांकडून समजलं आहे. दरम्यान राजन वर्‍हाडी हे फरार झाले असल्याचेही कळते.

नुकतीच नाशिक येथे एका कारखान्यावर कारवाई करत मोठ्या प्रमाणावर सुमारे 300 कोटींचा मेफेड्रॉन साठा जप्त करण्यात आला होता. ड्रग रॅकेट आरोपी ललित पाटील नुकताच ससून रुग्णालयातून पोलीसांच्या ताब्यातून पळून गेलेला आहे. काही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. या प्रकरणात जुन्नरच्या या कारवाईशी दाट संबंध असल्याची दाट शक्यता स्थानिक बोलून दाखवत आहेत. 

दरम्यान अद्यापही माध्यमांना या कारवाई बाबत माहिती दिली जात नसून सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 26 किलो अल्प्राझोलम आणि ईतर कच्चा माल सापडल्याचे समजते. अल्प्राझोलम हे मानसिक विकारांमध्ये वापरले जात असून गुंगीकारक असल्याचे तज्ज्ञांकडून समजते. Alprazolam मुळे विशेषत: वयस्क लोकांमध्ये , स्मृति सम्बन्धीत समस्या, पेंग, संभ्रम निर्माण होऊ शकतो. स्मरणशक्तीत बिघाड, गरगरणे, गुंगी येणे, नैराश्य, संभ्रम, शरीराच्या हालचालींवरील नियंत्रण यामुळे सुटण्याची दाट शक्यता आहे. 

पुणे जिल्हा डग्जच्या विळख्यात…

 मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अमली पदार्थ सापडत आहे. कधी अफुची शेती केली जाते तर कधी लॅब्समध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन तयार केलं जातं. अमली पदार्थ पथकाची या सगळ्या ड्रग्ज माफियांवर करडी नजर आहे. मात्र तरीही ड्रग्ज माफिया बिनधास्तपणे ड्रग्जची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील हे ड्रग्ज तस्करी कधी थांबणार?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

इतर महत्वाची बातमी-

sasoon Hospital Drug Racket : ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: भूषण पाटील अन् साथीदाराला 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात न्यायाधीशांनी पोलिसांना काय सुनावलं?

[ad_2]

Related posts