Virat Kohli Vs Naveen Ul Haq Everyone Waited For 6 Months To See Virat Kohli Vs Naveen Ul Haq But They’re Now Smiling Together

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat kohli vs naveen ul haq : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यापेक्षा विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्या वादाची चर्चा रंगली होती. सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंचा सामना झाल्यानंतर काय स्थिती होईल, अशी चर्चा सुरु होती. सकाळपासून या दोघांमधील टशनची चर्चा सुरु होती. पण मैदानात या दोन खेळाडूंनी गळाभेट घेऊन वाद संपल्याचे चाहत्यांना सांगितले. आयपीएल सामन्यादरम्यान या दोन खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले होते. पण आता विराट कोहली आणि नवीन उल हक यांनी मैदानात गळाभेट घेत आपल्यातील कटूता संपल्याचे सांगितले. 

विराट कोहली फंलदाजीला आल्यानंतर चाहत्यांनी नवीन उल हक याला डिवचण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवत प्रेक्षकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यावेळी समालोचन करणाऱ्या गौतम गंभीर यानेही प्रतिक्रिया दिली. नवीन आणि विराट यांच्यातील वाद संपलेला आहे. खेळाडूमध्ये मैदानात थोडाफार वाद होतच असतो. सामना झाल्यानंतर या सर्व गोष्टी विसरतात, त्यामुळे प्रेक्षकांनीही खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल करताना विचार करायला हवा. 

विराट कोहली याने मोठेपणा दाखवत नवीनला डिवचणाऱ्या प्रेक्षकांना शांत केले. त्यांनतर खिलाडूवृत्ती दाखल नवीन याची गळाभेट घेतली. या दोघांच्या गळाभेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट कोहलीचे चाहते याची चर्चा करत आहेत. तर काहींच्या मते, हा आजच्या दिवसातील सर्वात मस्त फोटो आहे.

 

विराट-नवीन यांच्यात नेमकं झालं काय होतं ?

आयपीएल 2023 च्या हंगामात सर्वाधिक चर्चा झाली ती, कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील वादाची. 1 मे 2023 रोजी लखनऊ येथे झालेल्या रॉयल चॅलेंजर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यानंतर नवीन-उल-हक प्रसिद्धीझोतात आला. लखनौकडून खेळताना नवीन विराट कोहलीशी भरमैदानात भिडला होता. नंतर या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातही वाद झाला होता. 



[ad_2]

Related posts