Skoda Slavia Matte Edition Launched In India Check Price Features Engine And Rivals Details Here

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Skoda Slavia 2023: स्कोडा (Skoda) कार उत्पादक कंपनीने त्यांच्या लोकप्रिय सेडान Slavia कारचं मॅट एडिशन भारतीय बाजारात लाँच केलं आहे, ज्याची सुरुवातीची किंमत 15.52 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. या कारमध्ये ग्राहकांना आता अजून नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. स्लाव्हियाचा हा व्हेरिएंट इतर प्रकारांपेक्षा 40,000 रुपयांनी महाग आहे. या कारचे फिचर्स, इंजिन पर्याय आणि स्पर्धकांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

स्कोडा स्लाव्हिया मॅट एडिशनची किंमत

स्कोडा स्लाव्हिया मॅट एडिशनची (Skoda Slavia Matte Edition) किंमत जाहीर करण्यात आली आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Slavia कारच्या टॉप व्हेरियंटपेक्षा Slavia Matte Edition नवीन कार 40,000 रुपयांनी महाग असणार आहे. कारच्या डिझाईनमध्ये थोडाच बदल करण्यात आला आहे. रंग पर्यायांव्यतिरिक्त कारमध्ये जास्त बदल नाही.

स्लाव्हिया मॅट एडिशनचे फिचर्स

स्लाव्हिया मॅट एडिशन (Skoda Slavia Matte Edition) कारमधील डॅशबोर्ड पूर्णपणे काळ्या रंगाचा आहे. कारमध्ये नव्याने 10-इंच टचस्क्रीन देण्यात आली आहे. इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीट तसेच फूटवेल लाईट्स कारमध्ये देण्यात आल्या आहेत.

स्लाव्हिया मॅट एडिशन कारमध्ये 8-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल-पेन सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट्स आणि क्रूझ कंट्रोल असे फिचर्स देण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने कारमध्ये 6 एअरबॅग्ज, हिल-होल्ड असिस्ट, रियर पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखे दमदार फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

स्लाव्हिया मॅट एडिशन इंजिन पर्याय

स्लाव्हिया मॅट एडिशन (Skoda Slavia Matte Edition) कारमध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. जे 115PS पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तसेच कारमध्ये आणखी एक 1.5 लिटर युनिट टर्बो-पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन 150PS पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच हे इंजिन 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन पर्यायसह जोडण्यात आलं आहे.

स्लाव्हिया मॅट एडिशन कोणत्या कारशी स्पर्धा करते?

स्कोडाची स्लाव्हिया मॅट एडिशन (Skoda Slavia Matte Edition) ही कार Honda City, Hyundai Verna, Volkswagen Virtus आणि Suzuki Ciaz या सेडान कारशी अधिकतम स्पर्धा करते.

हेही वाचा:

Scooter Launch: ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक स्कूटर नेपाळमध्ये होणार लाँच; नेमकी कितीला मिळणार?

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts