Devendra Fadnavis On OBC Caste Census Saying Mandal Commission Implement Due To Bjp During VP Singh Govt

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोहरादेवी, यवतमाळ : काँग्रेसकडून नोकऱ्यांमधील ओबीसींची रिक्त पदे (OBC Reservation) आणि जातनिहाय जनगणना (Caste Census) मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे आता भाजपकडून त्यास प्रत्युत्तर देण्याची रणनीति आखली जात आहे. राज्यातही ओबीसी घटक महत्त्वाचा ठरणार असून आता भाजप आक्रमक झाली आहे. पोहरादेवी येथे झालेल्या सभेत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेससोबत शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) गटावर टीका केली आहे.  व्ही. पी. सिंह यांचे सरकार आल्यानंतर भाजपने मंडल आयोग लागू करण्यासाठी आग्रह धरला. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ओबीसी आरक्षणाला विरोध केला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. भाजपा नैसर्गिकरित्या ओबीसी, भटक्या-विमुक्तांचा पक्ष,आमचा डीएनए हाच एकच असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. 

सेवाग्रामला सुरु झालेली ओबीसी यात्रेचा समारोप बंजारा समाजाच्या काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी या ठिकाणी झाला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. पंतप्रधान मोदींजीचे सरकार आल्यानंतर ओबीसी आणि भटक्या मुक्त समाजाना न्याय मिळाला. पंतप्रधान मोदी हे कायम भटक्या, ओबीसींचा विचार करतात म्हणून देशातील कणखर ओबीसी नेत्याला संपवण्यासाठी 25 पक्ष एकत्रित आले असल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.  पोहरादेवीच्या विकासासाठी मी मुख्यमंत्री असताना प्रयत्न सुरू केले. दिवंगत बंजारा धर्मगुरू रामराव बापूचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. 

भाजपमुळे मंडल आयोगाच्या शिफारसी लागू…

मोदी सत्तेत आल्यापासून ओबीसींवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. ओबीसींची काळजी मोदींच्या आधीच्या कोणत्याच सरकारने केली नसल्याचा दावा देखील त्यांनी केली. व्ही.पी. सिंगांचं सरकार आल्यावर भाजपाच्या आग्रहाने मंडल आयोग लागू करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या पक्षानं ओबीसी आणि मंडल आयोगाचा विरोध केला होता, अशी आठवणही फडणवीस यांनी करून दिली.  देशातील कणखर ओबीसी नेतृत्वाला कमकुवत करण्यासाठी देशातील 25 पक्ष एकत्र आले.

राहुल गांधींना आता ओबीसींची काळजी वाटायला लागली. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे 58 टक्के शिष्यवृत्ती ओबीसींना देण्यात येत आहे. देशाच्या मंत्रीमंडळातले 60 टक्के मंत्री एसटी, एससी, ओबीसींचे प्रतिनिधीत्व आहे. काँग्रेसने दिलेल्या 250 मुख्यमंत्र्यांपैकी फक्त 17 टक्के मुख्यमंत्री ओबीसी समुदायाचे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तर भाजपच्या 68 पैकी 31 टक्के मुख्यमंत्री ओबीसींचे आहेत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपला देश होतोय, हे फक्त मोदींमुळे होत असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. 

अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते.  तेव्हा एकही वस्तीगृह ओबीसींसाठी काढले नाही. आम्ही 36 वसतीगृह ओबीसींसाठी सुरू करत आहे. पुढच्या तीन वर्षांत ओबीसींसाठी राज्यात 10 लाख घरे बांधणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले. 

ओबीसीची जनगणना करण्यास नकार नाही… 

ओबीसींची जनगणना करायला आमच्या सरकारने कधीच नकार दिला नसल्याचे ही फडणवीस यांनी म्हटले. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून जातनिहाय जनगणना करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावर केंद्र सरकार अथवा भाजपकडून कोणतेही थेट भाष्य होत नसताना फडणवीस यांनी ओबीसींची जनगणना करण्यास विरोध नसल्याचे म्हटले आहे. जातीनिहाय जनगणना करायला आमचा विरोध नाही. परंतु, जाती-जातीत भांडणं लावू देणार नाही.  राजकीय पोळी भाजण्यासाठी असे सर्वे केले जाऊ नये असेही फडणवीस यांनी म्हटले. 

[ad_2]

Related posts