Cricket Return In Olympics Cricket Return To The Olympics For The Los Angeles 2028 Games Has Been Approved By The International Olympic Committee Executive Board

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Cricket Return In Olympics : क्रिकेट पुन्हा एकदा तब्बल 128 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये (Cricket Return In Olympics) परतणार आहे. अमेरिकेत 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हिरवा झेंडा दाखवला आहे. यापूर्वी 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा भाग होता. ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये असेल. याशिवाय स्क्वॅशला 2028 च्या ऑलिम्पिक खेळाचा भाग बनवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (International Olympic Committee) बैठकीत क्रिकेट आणि स्क्वॅशला 2028 साठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. क्रिकेट आणि स्क्वॉशसह एकूण 5 खेळांचा समावेश असेल.

बोर्डाच्या शिफारशीला मान्यता देण्यासाठी आयओसी सदस्य आता सोमवारी मतदान करतील. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले की, नवीन खेळ ऑलिम्पिक चळवळीला “नवीन खेळाडू आणि चाहत्यांच्या समुदायाशी संलग्न” करण्याची परवानगी देतात. हे प्रस्ताव आणि हे खेळ 2028 मधील आमच्या यजमानांच्या क्रीडा संस्कृतीशी, अमेरिकन क्रीडा संस्कृतीशी पूर्णपणे सुसंगत आहेत.ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा यापूर्वीचा एकमेव सहभाग पॅरिस 1900 मध्ये होता, जेव्हा ग्रेट ब्रिटनने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव केला होता. नेदरलँड आणि बेल्जियमने माघार घेतल्यानंतरही हा एकमेव सामना होता.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणाले की, लॉस एंजेलिस आयोजन समितीने पाच नवीन खेळ सादर करण्याचा प्रस्ताव आयओसी कार्यकारी मंडळाने पॅकेज म्हणून स्वीकारला आहे. बेसबॉल आणि सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस, स्क्वॅश आणि क्रिकेट या पाच खेळांचा समावेश आहे.अलीकडेच चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या गेलेल्या आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाने विजयी झेंडा फडकवत सुवर्णपदक पटकावले. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने होती.

भारताची थेट उपांत्यपूर्व फेरीतून सुरुवात

पुरुष आणि महिला दोन्ही भारतीय संघांनी थेट उपांत्यपूर्व फेरीतून सुरुवात केली. पुरुष संघाने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा 23 धावांनी पराभव केला. यानंतर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा तर अंतिम फेरीत अफगाणिस्तानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उपांत्य फेरीत बांगलादेशचा 8 गडी राखून तर अंतिम फेरीत श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव करत पदक जिंकले.

इतर महत्वाच्या बातम्या 

[ad_2]

Related posts