Rahu Ketu Shani Gochar : चंद्रग्रहणानंतर राहू-केतू आणि शनी गोचर! अशुभ योगामुळे 5 राशींनी अखंड राहावं सावध

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahu Ketu Shani Gochar :  दसऱ्यानंतर शरद पौर्णिमे 29 ऑक्टोबरला चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे. त्याच अगदी दुसऱ्या दिवशी मायावी राहू आणि केतू आपली स्थिती बदलणार आहे. त्यात शनीदेवाची भर पडणार आहे. दिवाळीपूर्वी शनि मार्गी होणार आहे. (Rahu-Ketu and Shani transit after lunar eclipse Due to inauspicious yoga 5 zodiac signs should be careful)

तब्बल 18 महिन्यांनी 30 ऑक्टोबरला राहू मीन राशीत आणि केतू तूळ राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबरला शनिदेव कुंभ राशीत मार्गी होईल. राहू-केतू आणि शनि गोचरमुळे काही राशींना तो तापदायक ठरणार आहे. या राशींच्या लोकांना अखंड सावध राहावं लागणार आहे. 

मेष (Aries Zodiac)

या राशीसाठी राहू केतू आणि शनी गोचर संमिश्र परिणाम घेऊन आला आहे. यांच्या आयुष्यात या काळात तणाव वाढणार आहे. व्यवसायिकांसमोर अनेक संकट उभे राहणार आहे. या काळात पैसा पाण्यासारखा खर्च होणार आहे. तर अचानक अनेक आर्थिक संकट दारावर उभे असणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत नातं खराब होऊ शकतं. 

कर्क (Cancer Zodiac) 

या राशीच्या लोकांना अनेक संकटाचा सामना करावा लागणार आहे. वैयक्तिक आयुष्यात मानसिक तणावाला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे. अनावश्यक खर्च होणार आहे. तुमच्यावर कर्ज काढण्याची वेळ येणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्यादेखील त्रासदायक ठरणार आहे. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. मालमत्तेसंबंधात विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा फटका बसेल. 

सिंह (Leo Zodiac) 

या लोकांना आयुष्यात अनेक चढ उताराचा सामना करावा लागणार आहे. कठीर परिश्रम करुनही तुम्हाला अपेक्षित फळ मिळणार नाही. व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय तोटाचा असणार आहे. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या अन्यथा संकटांना आमंत्रण द्याल. अपघाताचा धोका असल्याने वाहन जपून चालवा. या काळात संयम बाळगा नाही तर होणाऱ्या गोष्टी पण बिघडतील. 

वृश्चिक (Scorpio Zodiac)

वृश्चिक राशीच्या लोकांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. राहू केतू आणि शनि गोचरमुळे आरोग्याची समस्या उद्भवणार आहे. नवीन प्रकल्प किंवा करार करताना शंभर वेळा विचार करा. सर्व बाजूने माहिती काढून निर्णय घ्या. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. व्यवसायात भागीदाराशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. 

मीन (Pisces Zodiac)

या राशीची आधीच पहिला टप्प्याची साडेसाती सुरू आहे. अशात राहू केतू आणि शनि गोचर या राशीच्या आयुष्यात वादळ आणणार आहे. कुटुंबातील नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे. आर्थिक घडी बिघडणार असून कर्ज घेण्याची वेळ येणार आहे. भागीदार व्यवसायात वाद आणि मतभेद होणार आहेत. या लोकांना आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts