ICC Cricket World Cup 2023 England In Collapse Mode With 91 For 4 Fightback By Afghanistan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : अफगाणिस्ताने इंग्लंडला फलंदाजीमध्ये नाचवल्यानंतर आता गोलंदाजीमध्ये सुद्धा दमदार कामगिरी करत विश्वविजेत्या इंग्लंडला चांगलंच अडचणीत आणलं आहे. 285 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था काहीशी बिकट झाली आहे. इंग्लंडची स्थिती 18 व्या षटकांत 4 बाद 96 अशी झाली आहे. इंग्लंडच्या डावाची सुरुवात जॉनी बेअरस्टाॅ आणि डेव्हिड मालन यांनी केली. मात्र बेअरस्टाॅ अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला. त्याला फारुकीने बाद करत अफगाणिस्तानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला जो रूट सुद्धा स्वस्तात परतला. त्याला सातव्या षटकामध्ये मुजीफने क्लीन बोल्ड करत अफगाणिस्तान संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था दोन बाद 33 अशी झाली.

डेव्हिड मालन एका बाजूने किल्ला लढवत असतानाच 13 व्या षटकांत नबीने बाद करत आणखी एक यश अफगाणिस्तानला मिळवून दिले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था 3 बाद 68 अशी झाली. दरम्यान, अफगाणिस्तानने मागील सामन्यात भारताविरुद्ध 73 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र गोलंदाजीमध्ये त्यांची हवा निघाली होती. आज मात्र फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही अफगाणिस्तानच्या संघाकडून चमकदार कामगिरी सुरू आहे. जोस बटलरही 9 धावांवर बाद झाला. 

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने नंतर 49.5 षटकात सर्वच गडी गमावत 284 धावा केल्या. यामध्ये सलामीवीर गुरुबाजने अतिशय दमदार कामगिरी करताना अवघ्या 57 चेंडूत 80 धावांचा पाऊस पडला. यामध्ये त्याने आठ चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. दमदार सलामीनंतर डाव कोलमडला होता. मात्र, मधल्या फळीत फलंदाजांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. 

मधल्या काळातील अलीखीलने 58 धावांची खेळी करत संघाला मोठा आधार दिला. त्यानंतर रशीद खान आणि मुजीब यांनी अनुक्रमे प्रत्येकी 23 आणि 28 धावांची खेळी करत बाकी अफगाणिस्तान संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. 284 धावांमध्ये त्यांचा डाव आटोपला. आज इंग्लंडकडून अफगाणिस्तानची फलंदाजी मोडून काढण्यासाठी तब्बल सात गोलाजांचा वापर करण्यात आला. मात्र, त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. आदिलने तीन विकेट घेतल्या. 



[ad_2]

Related posts