[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Urvashi Rautela Phone : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी आली होती. यादरम्यान अभिनेत्रीसोबत एक मोठी घटना घडली. उर्वशी रौतेलाचा 24 कॅरेट सोन्याने मढवलेला आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला. फोन गहाळ झाल्यानंतर उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.
उर्वशी रौतेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. त्यानंतर यावेळी अभिनेत्रीचा 24 कॅरेट सोन्याच्या आयफोनवर चोरट्यांनी डल्ला मारला. उर्वशीने ट्विटरवर ही माहिती दिली. ज्यामध्ये त्याने अहमदाबाद पोलिसांना टॅग केले आणि लिहिले आहे की, “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेटचा आयफोन हरवला आहे. कृपया, कोणाला ते सापडल्यास, कृपया ताबडतोब संपर्क साधा.” तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरही पोस्ट देखील शेअर केली आहे.
उर्वशीने स्टेडियमचा व्हिडिओ शेअर केला होता
यापूर्वी उर्वशी रौतेलाने तिच्या स्टेडियममधील एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती भारताची विजयाकडे वाटचाल करताना खूप आनंदी दिसत होती. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी ही अभिनेत्री निळ्या रंगाचा ड्रेस घालून स्टेडियममध्ये पोहोचली. अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला. याआधीही उर्वशी अनेकदा मॅच पाहताना स्पॉट झाली आहे.
📱 Lost my 24 carat real gold i phone at Narendra Modi Stadium, Ahmedabad! 🏟️ If anyone comes across it, please help. Contact me ASAP! 🙏 #LostPhone #AhmedabadStadium #HelpNeeded #indvspak@modistadium @ahmedabadpolice
Tag someone who can help pic.twitter.com/2OsrSwBuba
— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) October 15, 2023
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादवसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. त्यांच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. लवकरच ही अभिनेत्री काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ज्याची त्याचे चाहते खूप वाट पाहत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
[ad_2]