Mercedes Benz Offering Heavy Discounts Upto 5 Lakhs On Their Electric Models

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mercedes Electric Cars: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी सातत्याने वाढत आहे. वाढती मागणी  पाहता लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने, देशात आपल्या इलेक्ट्रिक कारची (EV) विक्री वाढवण्याचा निश्चय केला आहे. यासाठी मर्सिडीज तिच्या इलेक्ट्रिक कार खरेदीवर 5 लाख रुपयांपर्यंतची आकर्षक सवलत ऑफर देत आहे. मर्सिडीज बेंझ ही कंपनी भारतीय बाजारपेठेत लक्झरी कार विकते. त्यांनी फेस्टिव्हल स्पेशल ऑफर ठेवली आहे.

मर्सिडीज इलेक्ट्रिक कारवर 5 लाखांची सूट

मर्सिडीज-बेंझ सस्टेनेबिलिटी फेस्टचा एक भाग म्हणून त्याच्या विद्यमान ग्राहकांना इतर अनेक फायद्यांसह लॉयल्टी बोनस ऑफर करत आहे. ही सवलत ऑफर कंपनीच्या सर्व इलेक्ट्रिक कारसाठी आहे, ज्यामध्ये कंपनीच्या ग्राहकांना कोणतीही इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यास 5 लाख रुपयांची सूट मिळू शकते. कंपनीच्या EV लाइनअपमध्ये EQB, EQE आणि EQS सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे. तर मग जाणून घेऊया या डिस्काउंट ऑफर अंतर्गत कोणते फायदे देण्यात येत आहे.

काय आहे ऑफर?

मर्सिडीज-बेंझ 2025 पर्यंत तिच्या पोर्टफोलिओमध्ये 50% ईव्हीसह 2030 पर्यंत संपूर्ण लाइनअप इलेक्ट्रिक करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यासाठी कंपनी इलेक्ट्रिक कारला प्रोत्साहन देण्यासाठी ऑक्टोबरच्या शेवटच्या बुधवारी ‘सस्टेनेबिलिटी डे’ साजरा करण्यासाठी सस्टेनेबिलिटी फेस्टचं आयोजन करत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनी ग्राहकांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर 5 लाख रुपयांची सूट आणि अतिरिक्त फायदे देत आहे.

टॅक्स सपोर्टचा मिळणार फायदा

मर्सिडीज-बेंझ EV नोंदणीवर रोड टॅक्स आकारणाऱ्या राज्यांमधील ग्राहकांना 50% टॅक्स सपोर्ट देखील देत आहे. ज्यामध्ये तेलंगणा, केरळ, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश आणि इतर राज्यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनी सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी अतिरिक्त अॅडऑन म्हणून विनामूल्य चार्जिंगची सुविधा देखील प्रदान करत आहे.

2023 मध्ये वाढली मर्सिडीज-बेंझ ईव्हीची विक्री

Mercedes-Benz सध्या EQB 7-सीटर SUV, नवीन EQE SUV आणि EQS लक्झरी सेडान भारतात तिच्या EV लाईनअपचा भाग म्हणून विकते. कंपनीचा भारतातील एकूण EV विक्रीचा हिस्सा सुमारे 5% आहे. कंपनीने या वर्षी सप्टेंबरपर्यंत 638 इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत.

वॉरंटी पॅकेजेसही ऑफर करत आहे कंपनी

मर्सिडीज-बेंझ भारतात स्टार ऍजिलिटी+ प्रोग्राम देखील ऑफर करत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना आकर्षक डाऊन पेमेंट आणि EMI पर्याय, पहिल्या वर्षासाठी मोफत विमा, कमी डाऊन पेमेंट योजना, 4 वर्षांची वॉरंटी आणि मेंटेनन्स पॅकेज मिळेल.

हेही वाचा:

Upcoming Tata SUVs: 17 ऑक्टोबरला होणार धमाका! टाटाची Harrier आणि Safari Facelift कार होणार लाँच

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts