Virat Kohli Gives Epic Reaction To Arijit Singh Screams I Love You Virat During Live Performance Watch Video Ind Vs Pak World Cup 2023 Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Virat Kohli : विश्वचषकाच्या (World Cup 2023) संगीत कार्यक्रमात लाईव्ह परफॉर्मन्सवेळी गायक अरिजित सिंह (Arijit Singh) ”आय लव्ह यू, विराट” (I Love You, Virat) म्हणत ओरडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया (Social Media) वर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अरिजितने आय लव्ह यू म्हटल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) ची प्रतिक्रियाही सध्या जोरदार चर्चेत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये परफॉर्मन्सदरम्यान ‘आय लव्ह यू विराट’ असं ओरडणाऱ्या अरिजित सिंहला कोहलीनं सुंदर प्रतिक्रिया दिली.

लाईव्ह परफॉर्मन्सवेळी अरिजित सिंह ओरडला, ‘I Love You, Virat’

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याआधी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संगीत कार्यक्रमात दिग्गजांनी हजेरी लावली. गायिका सुनिधी चौहान, नेहा कक्कड यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसह अरिजित सिंह या कलाकारांनी विश्वचषक 2023 च्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय-प्रोफाइल सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये दमदार परफॉर्मन्स दिला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी अरिजित सिंग, नेहा कक्कड, सुनिधी चौहान, शंकर महादेवन, श्रद्धा कपूर आणि सुनिधी चौहान यांनी एका शानदार संगीत कार्यक्रमात सादर केले. यातील अरिजित सिंहचा परफॉर्मन्स खास कारणामुळे चर्चेत आहे.

कोहलीची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी संगीत कार्यक्रम सुरु असताना विराट कोहली इतर खेळाडूंसह सरावात व्यस्त होता. विराट खेळासाठी वॉर्म अप करत होता. यावेळी अरिजित आणि इतर कलाकारांचा परफॉर्मन्स सुरु होता. अरिजितने परफॉर्मन्सदरम्यान ‘आय लव्ह यू विराट’ अशी हाक दिली. यानंतर विराट कोहली स्मित हास्य दिलं. अरिजित सिंह आणि विराट कोहलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ :

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव

विराट कोहलीला या सामन्यात फारशी चांगली खेळी करता आली नाही कारण तो अवघ्या 16 धावांवर बाद झाला. दरम्यान, रोहित शर्माने या सामन्यात धडाकेबाज सुरुवात करून पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकवून दिला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला केवळ 191 पर्यंत रोखलं. यामुळे भारतासमोर 192 धावांचं लक्ष्य होतं. बाबर आझम 50 धावा आणि मोहम्मद रिझवान 49 धावा करत 82 धावांची भागीदारी केली. पण इतर खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीवीर शुभमन गिलचा डाल थोडक्यात आटोपल्यावर कर्णधार रोहित शर्माने 86 धावांची तुफान खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला.

महत्वाच्या इतर बातम्या : 



[ad_2]

Related posts