Pune Navale Bridge Accident Container Catching Fire Some Died Many Were Injured Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे.  दोन कंटेनरची धडक झाल्याने एका कंटेनरनी पेट घेतला. या आगीत कंटानरच्या केबीनमधे बसून प्रवास करणारे काहीजण होरपळून मृत्यूमुखी पडलेत. तर इतर जखमी झालेत.  या दोन्ही कंटेनरला लागलेली आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. या घटनेमध्ये नेमके किती जण मृत्यूमुखी पडले आहेत याची माहिती अद्याप समोर आली नाही.  

पुण्यातील नवले पुलावर अपघाताचं सत्र सुरूच असून पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. पुणे-बेंगलोर हायवेवर असलेल्या या पुलावर दोन कंटेनरची एकमेकांना धडक बसली. जोरदारल बसलेल्या या धडकेनंतर एका कंटेनरने पेट घेतला. त्या कंटेनरमधील केबिनमध्ये बसून काहीजण प्रवास करत होते. त्यामध्ये काही महिला आणि लहान मुलेही होती. त्यांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये अनेकजण जखमीदेखील झाले आहेत. 

मृत्यूचा नेमका आकडा अजून समोर आला नाही. गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे. परंतु नवले पूल हा किती धोकादायक आहे हे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या पुलाची रचना चुकीची असल्याचं अनेकांनी वेळोवेळी निदर्शनास आणली आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. 

[ad_2]

Related posts