Odi World Cup Most Sixes Record Rohit Sharma Very Close To Break Ab Ab De Villiers Record Ind Vs Ban

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

World Cup 2023 News : टीम इंडियाचा कर्णधार आणि सिक्स हिटिंग मशीन अर्थात रोहित शर्मा याने तीन सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम, विश्वचषकात वेगवान हजार धावा… यासह अनेक विक्रमांना तीन सामन्यात गवसणी घातली आहे. आता आणखी एक विक्रम रोहित शर्माच्या निशाण्यावर आहे. पुण्यात बांगलादेशविरोधात हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. हा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला फक्त चार षटकारांची गरज आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या एमसीए मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा एबी डिव्हिलिअर्सचा षटकारांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. 

हिटमॅनच्या नावावर जमा होणार मोठा रेकॉर्ड – 

सलग तीन सामने जिंकणारी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फॉर्मात आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. या लढतीत रोहित शर्मा विश्वचषकातील षटकारांचा विक्रम नावावर करणार आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजात रोहित शर्मा सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या पुढे युनिवर्स बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलिअर्स आहेत. एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या निशाण्यावर आहे. 

डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडणार रोहित – 

एबी डिव्हिलिअर्स याचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला चार षटकारांची गरज आहे. विश्वचषकात डिव्हिलिअर्सने आतापर्यंत 37 षटकार ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रोहित शर्माने विश्वचषकात आतापर्यंत 34 षटकार मारले आहेत. पुण्यात होणाऱ्या सामन्यात चार षटकार मारताच रोहित एबीला मागे टाकणार आहे. पुण्याच्या मैदानात चार षटकार मारताच विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा दुसरा फलंदाज होणार आहे. युनिवर्स बॉस ख्रिस गेल सध्या पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ख्रिस गेलच्या नावावर 49 षटकारांची नोंद आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे, सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला आहे. आता षटकारांचा विक्रम रोहितच्या निशाण्यावर आहे. 

वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज – 

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) – 49 छक्के

2. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण अफ्रीका) – 37 छक्के

3. रोहित शर्मा (भारत) – 34 छक्के

4. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 31 छक्के

5. ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – 29 छक्के

[ad_2]

Related posts